काय सांगता! ‘बिग बॉस मराठी ३’ मधील ‘हा’ स्पर्धक आहे दिवंगत अभिनेते दादा कोंडकेंचा नातू


‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात अनेक नामांकित स्पर्धकांचा समावेश झाला आहे. यामध्ये अभिनय क्षेत्रासोबत इतर क्षेत्रातील व्यक्तींचा देखील समावेश आहे. यापैकी एका स्पर्धकाची घरात आल्यापासून चांगलीच चर्चा आहे. तो स्पर्धक म्हणजे अक्षय वाघमारे. अक्षय हा एक अभिनेता आहे. यासोबत त्याची आणखी खास ओळख आहे. या आधी त्याची ही ओळख समोर आली नव्हती, पण बिग बॉसच्या घरात आल्यापासून तो खूपच चर्चेत आहे.

अक्षय वाघमारे हा दिवंगत कॉमेडी अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे. त्याची ही ओळख जास्त कोणाला माहित नव्हती, पण आता संपूर्ण महाराष्ट्राला ही ओळख माहित झाली आहे. खरं तर त्याच्या वडिलांची आत्या दादा कोंडकेंच्या कुटुंबातील सदस्य आहे, असे अक्षयने स्वत: सांगितले होते. तसेच अक्षय हा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा जावई आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्षयच्या मुलीचे अरुण गवळी यांच्यासोबत सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत होते. त्याच्या मुलीच्या फोटोची सर्वत्र खूप चर्चा झाली आहे. (This bigg Boss Marathi contestant is grand son of dada konakde)

अक्षयने अरुण गवळी यांची मुलगी योगिता हिच्याशी लग्न केले आहे. अक्षय आणि योगिताचा साखरपुडा २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी मे २०२० मध्ये लगीनगाठ बांधली होती. अक्षय आणि योगिताने यावर्षी १४ मेला त्यांच्या मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी तिचे नाव अर्णा असे ठेवले आहे.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात साप्ताहिक कार्यामध्ये शेफ बनून वाईट रेसिपी बनवण्याचा आदेश होता. या टास्कमध्ये निर्णय होऊ न शकल्याने तो रद्द झाला होता. अक्षयने आतापर्यंत ‘दोस्तीगिरी’, ‘फत्तेशिकस्त’, ‘युथ’, ‘बस स्टॉप’, ‘शिव्या’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

-पुण्यातून इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा वैभव तत्ववादी ‘असा’ बनला प्रसिद्ध अभिनेता; रंजक आहे त्याचा प्रवास

-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’


Leave A Reply

Your email address will not be published.