Saturday, March 2, 2024

संघर्षाच्या काळात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने ऑस्कर विजेत्या एमएम किरवानी यांच्या अल्बममध्ये केले होते डान्सर म्हणून काम

बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या दिया मिर्झाने नुकताच खुलासा केला आहे की, तिने ऑस्कर विजेत्या संगीतकार एमएम कीरवानी यांच्यासोबत काम केले आहे. तिने त्यांच्यासोबत एका म्युझिक अल्बममध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. दियाच्या या खुलासामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

दियाने सांगितले की, तिने अभिनयात करियर सुरु करण्याआधी मॉडेल म्हणून काम केले होते. तिने सांगितले की, या काळात तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिने पर डे बेसवर काम केले आहे. यात तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणून देखील काम केले. दियाने १९९९ साली एन स्वसा कात्रे यांच्या ‘जुंबलक्का’ गाण्यात डान्सर म्हणून काम केले होते. या चित्रपटात अरविंद स्वामी आणि ईशा कोप्पीकर मुख्य भूमिकेत होते.

दियाने तिच्या सुरुवातीच्या काळात अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. ज्यातील एक एमएम कीरावनी यांचा देखील होता. तेव्हा ती केवळ १५ वर्षाची होती. हा व्हिडिओ तिने हैद्राबादमध्ये शूट केला होता. हा व्हिडिओ तिने यूटुबवर देखील शोधला मात्र तिला तो सापडत नाही.

दियाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती अनुभव कश्यप यांच्या ‘भीड’मध्ये दिसली होती. यात तिने राजकुमार राव आणि भूमि पेडनेकर यांच्यासोबत काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा