Thursday, April 18, 2024

अर्चना गौतम कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

बिग बॉस 16‘ ची सिलबट्टा क्वीन अर्चना गौतमने स्पर्धकांसोबतच्या तिच्या मारामारी आणि विनोदातून शोमध्ये बरीच प्रशंसा मिळवली. ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात झपाट्याने यशाच्या पायऱ्या चढत आहे. बिग बॉसनंतर जणू तिला पंखच मिळाले आहेत. कधी तिच्या वक्तव्यामुळे, तर कधी फोटोशूटच्या माध्यमातून ही अभिनेत्री कायमच चर्चेत असते.

स्वत:ला लाइमलाइटमध्ये कसे ठेवायचे हे अर्चना गौतम (archana gautam) हिला चांगलेच ठाऊक आहे. खासकरून ‘बिग बॉस 16’ नंतर तिचा रुबाब चांगलाच बदलला आहे. अभिनेत्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते. कधी साडीत, कधी सूटमध्ये, तर कधी नववधूच्या रुपात अर्चना एकापेक्षा जास्त पोजमध्ये फोटोशूट करून घेते. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मासिकासाठी फोटोशूट केले, ज्याचा किलर व्हिडिओ आणि फोटो तिने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

‘बिग बॉस 16’ नंतर अर्चना गौतम इतर प्रोजेक्टमध्ये बिझी झाली आहे. तिने ‘खतरों के खिलाडी 13’ साइन केले आहे. त्याच वेळी, तिचे काही मॅगझिनसाठी फोटोशूट देखील आहेत, ज्यापैकी तिने एका शूटमधील व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे.

यामध्ये ती नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे. तिची बदललेली शैली पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. अर्चना गौतम इतकी बदललेली दिसत आहे की, कदाचित तुम्ही तिला आजपर्यंत असे पाहिले नसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

चाहते अर्चना गौतमच्या नव्या लूकचे कौतुक करताना थकत नाही आहेत. अर्चनाने ऑरेंज पँट आणि पिंक क्रॉप टॉपमध्ये अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. एका चाहत्याने अभिनेत्रीच्या या फाेटाेवर कमेंट करत लिहिले की,’पुष्पा नाम एकुण फायर समजले का? मुलगीच फायर आहे.'(tv actress archana gautam gets bold in front of camera pose like this for magazine photoshoot)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराट कोहलीने अनुष्कासोबत जिममध्ये केला डान्स; पाय माेडताच क्रिकेटरने केली आरडाओरड, व्हिडिओ व्हायरल

‘अनुपम काका, पापा तुमच्यापेक्षा चांगला डान्स करायचे, पण…’ सतीश कौशिक यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा