Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड खऱ्या प्रेमाचे उदाहरण देत ‘या’ कलाकारांनी केला आपल्या बालपणीच्या प्रियसीसोबत विवाह

खऱ्या प्रेमाचे उदाहरण देत ‘या’ कलाकारांनी केला आपल्या बालपणीच्या प्रियसीसोबत विवाह

हिंदी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात तयार होणारी नाती काही काळच टिकतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. या क्षेत्रात प्रेम, घटस्फोट आणि ब्रेकअप या गोष्टी चालतच असतात. बॉलिवूडमधून रोजच अफेअरच्या, ब्रेकअपच्या बातम्या येत असतात.  यामध्ये अनेक प्रेमप्रकरणे असे आहेत ज्यांची लवस्टोरी फार काळ टिकू शकली नाही, मात्र याला काही कलाकार अपवादही आहेत. हिंदी चित्रपट जगतातील अनेक अभिनेत्यांनी आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत, किंवा प्रेयसीसोबत लग्न करून  खऱ्या प्रेमाचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कोण आहेत हे प्रसिद्ध कपल्स चला जाणून घेऊ. 

शाहरुख खान -गौरी खान :

हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध जोडी म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचे नाव घेतले जाते. दोघांचेही लहानपणापासूनच  एकमेकांवर प्रेम होते. त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा शाहरुख खान १६ वर्षाचा आणि गौरी फक्त १४ वर्षाची होती. दोघांचा धर्म वेगळा असल्याने त्यांना लग्न करताना अनेक अडचणी आल्या मात्र तरीही त्यांनी आपले नाते टिकवत १९९१ मध्ये लग्नाची गाठ बांधली.

वरुण धवन- नताशा दलाल :
हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनने आपली बालमैत्रीण नताशासोबत विवाह केला होता. नताशा आणि वरुण शालेय जीवनापासून एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांनी दिर्घकाळ एकमेकांंना डेट केल्यानंतर विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
https://www.instagram.com/p/CVavsDch3ic/?utm_source=ig_web_copy_link
आयुष्यमान खुराना – ताहिरा कश्यप :
आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आयुष्यमान खुरानाही या यादीत आहे. आयुष्यमान अभिनासोबतच संगीत क्षेत्रातही खूप प्रसिद्ध आहे. त्याने आपली बालमैत्रीण ताहिरासोबत विवाह केला आहे. ताहिरा आणि आयुष्यमान शालेय जीवनापासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघांना दोन मुले आहेत.
https://www.instagram.com/p/CX6iMEBq_Bc/?utm_source=ig_web_copy_link
इशा देओल – भरत तख्तानी:
अभिनेत्री इशा देओलनेही आपला बालपणीचा मित्र भरत तख्तानीसोबत विवाह केला आहे. भरत शालेय जिवनापासून इशाच्या प्रेमात होता. हेच नाते शेवटपर्यंत टिकवत दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय  घेतला.

हे देखील वाचा