‘हेमाच्या जागी मी असते तर…’ धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या लग्नावर दिली होती प्रतिक्रिया 

हिंदी चित्रपट जगतात असे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले पहिले लग्न झालेले असतानाही दुसऱ्यांदा प्रेमविवाह केला आहे. यामध्ये दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra)आणि हेमा मालिनी (hema  malini) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची, वैवाहिक आयुष्याची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. मात्र  ज्यावेळी विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मोठी चर्चा रंगली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीनेही त्यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. काय म्हणाल्या होत्या त्या नेमक्या चला जाणून घेऊ. 

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात प्रेमळ आणि चर्चेत असलेली जोडी म्हणून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आधीच विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना लग्नाची मागणी घातल्याने त्यांनाही जोराचा धक्का बसला होता. मात्र कदाचित त्यांच्या नशिबात हेच होते. त्याआधी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा १९५४ मध्ये विवाह झाला होता. त्यांना सनी देओल, बॉबी देओल, विजयता आणि अजीता अशी चार मुलेही होती. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर प्रकाश कौर प्रचंड नाराज होत्या.

View this post on Instagram

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

समोर आलेल्या बातम्यांनुसार, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयावर धर्मेंद्र यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या या निर्णयावर तेव्हा टिकाही झाली होती. मात्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी याबद्दल धर्मेंद्र यांंचे समर्थन केले. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “धर्मेंद्र चांगले पती बनू शकले नसले तरी ते खूप चांगले पिता आहेत. आपल्या मुलांसाठी ते नेहमीच वेळ काढत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. मात्र मी जर हेमा मालिनी यांच्या जागी असते तर असे कधीच केले नसते.” असेही त्या पुढे म्हणाल्या होत्या. धर्मेंद्र यांच्यावर टिका करणाऱ्या लोकांवरही त्याने संंताप व्यक्त केला होता. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अशा प्रकारे विवाह केल्याचे सांगत आपल्या पतीचे समर्थन केले होते.

Latest Post