Wednesday, March 27, 2024

चित्रपट जगतात फ्लॉप ठरुनही फरदीन खान आहे कोट्यावधीचा मालक, जाणून घ्या त्याच्या कमाईचे साधन

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना घरातुनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. त्यांचे संपूर्ण बालपण चित्रपटांच्या वातावरणातच गेल्याने साहजिकच त्यांना या क्षेत्राबद्दल ओढा निर्माण झाला आणि त्यांनी यातच करिअर करण्याचे ठरवले. मात्र असे असूनही काही कलाकारांना या मिळालेल्या संधीचे सोनं करता आले नाही. त्यांना आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडता आली नाही. कालांतराने ते या क्षेत्रापासून दुर गेले मात्र तरीही त्यांच्याकडे असलेल्या अफाट संपत्तीमुळे ते कलाकार नेहमीच चर्चेत येतात. या अभिनेत्यांनी चित्रपट जगातून बाहेर पडल्यानंतर इतर विविध उद्योगांमधून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेता फरदीन खानचे. नेहमीच चर्चेत असणाऱ्या फरदीन खानचा आज ( ८ मार्च) वाढदिवस, जाणून घेऊ या त्याच्या आयुष्याबद्दल.

अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan ) हा हिंंदी चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जातो. दिग्गज अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा असलेल्या फरदीनला लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. मात्र आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडायला तो अपयशी ठरला. 1998 मध्ये आलेल्या ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून त्याने आपल्या हिंंदी चित्रपट जगतातील कारकिर्दिला प्रारंभ केला. आपल्या पहिल्याच चित्रपटातून त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळवत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. या चित्रपटानंतर त्याला अनेक दर्जेदार चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष छाप पाडु शकले नाहीत. याच अपयशाला कंटाळून शेवटी फरदीनने २०१० मध्ये हिंदी चित्रपट जगतातून दूर होण्याचा निर्णय घेतला.

समोर आलेल्या माहितीनुसार, यानंतर फरदीनने लंडनमध्ये राहण्यचा निर्णय घेतला होता. त्याचा लंडनमधील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमधील त्याचे वाढलेले वजन पाहून नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोलही केले होते. त्यानंतर आता अलीकडेच त्याला मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. मात्र यावेळी त्याच्या फिटनेसची सगळीकडे चर्चा झाली. त्याने त्या काळात तब्बल १८ किलो वजन कमी केल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. तत्पुर्वी चित्रपट जगतात अपयशी ठरला असला तरी फरदीनने उद्योग जगतात मात्र प्रचंड यश मिळवले आहे. चित्रपट जगतातून बाहेर पडल्यानंतर त्याने गोदरेज कंपनीसोबत १०० कोटीचा भागीदारी करार केला होता त्याच्या याच यशामुळे त्याच्याकडे सध्या २९२ कोटी इतकी जंगम मालमत्ता आहे.

दरम्यान फगदीन खान आता पून्हा एकदा चित्रपट जगतात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे, लवकच तो ‘विस्फोट’ या चित्रपटात दिसणार आहे. या संजय गुप्ता यांच्या या चित्रपटात रितेश देशमुखही दिसणार आहे. फरदीनला काही वर्षापुर्वी ड्रग्ज प्रकरणातही अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे कोकीन बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे देखील वाचा