Tuesday, March 5, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ सुपरस्टारने विराट कोहलीला पछाडत मिळवला जास्त ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या सेलेब्रिटींचा टॅग

बॉलिवूडमधील आजच्या घडीचा सुपरस्टार म्हणून अभिनेता रणवीर सिंग ओळखला जातो. त्याने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आपल्या प्रभावी अभिनयासोबतच त्याच्या उत्साहासाठी, ऊर्जेसाठी आणि त्याच्या विचित्र फॅशनसाठी देखील तो कमालीचा प्रसिद्ध आहे. अनेक हात सिनेमे देणारा रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी राणी की प्रेमकहाणी’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारा रणवीर सध्या त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे खूपच गाजत आहे.

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार रणवीर सिंग भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. याबाबतीत त्याने भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे. कॉर्पोरेट इंवेस्टीगेशन आणि रिस्क कंसल्टिंग फर्म क्रॉलच्या एका रिपोर्टनुसार रणवीर सिंग भारतातील सर्वात श्रीमंत कलाकार ठरला आहे. क्रॉल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२२ मध्ये रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू १८१.७ मिलियन डॉलर सांगितली गेली आहे. तर विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २०२२ सलत १७६.९ मिलियन डॉलर असल्याचे सांगितले आहे. यावरूनच रणवीर सिंगने आता कोहलीला ब्रँड व्हॅल्यूमध्ये मात दिली असल्याचे चित्र आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रिपोर्टनुसार २०२१ च्या तुलनेत रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू २९.१ टक्क्यांनी वाढली असून, २०२१ शाळातील त्याची व्हॅल्यू १५८.३ मिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. दरम्यान मागील ५ वर्षांपासून विराट कोहली भारतातील सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी होता.

रणवीर सिंगच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो लवकरच रॉकी और राणी की प्रेमकहाणीमध्ये दिसणार असून हा सिनेमा २८ जुलै २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

हे देखील वाचा