Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

आपल्या आवडत्या कलाकाराबाबत जाणून घ्यायला कोणाला आवडत नाही?, अर्थातच सर्वांना आवडते. कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीबाबत चाहते उत्सुक असतात. त्यामध्ये कलाकारांचे खानपान, चित्रपटांपासून ते त्यांच्या आलिशान वस्तूंबाबत जाणून घेण्यात चाहते कायम आघाडीवर असतात. विशेष म्हणजे आपले आवडते कलाकार त्यांच्या लहानपणी कसे दिसत असतील?, कदाचित हा प्रश्न जवळपास सर्व चाहत्यांना पडतो. आता अशाच एका लहान मुलाचा ब्लॅक अँड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तो मुलगा आपल्या आजीसोबत बसलेला दिसत आहे.

आजीसोबत सोफ्यावर बसून मोठ्या निरागसतेने पाहणारा हा चिमुकला आहे तरी कोण? तुम्ही अजूनही या चिमुकल्याला ओळखले, नसेल तर हा चिमुकला मुलगा इतर कोणी नसून चित्रपटात दुष्मनांना सळो की पळो करून सोडणारा सुपरस्टार सनी देओल आहे. या फोटोत सनी आपली आजी म्हणजेच धर्मेंद्र यांच्या आईसोबत बसलेला दिसत आहे. हा फोटो पाहून सनीला ओळखणे खूपच कठीण आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला आतापर्यंत शेकडो लाईक्स मिळाले आहेत. (This Child Seen With Grandmother In The Photo Is A Big Star Today)

सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्याबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सनी आणि धर्मेंद्र ही बापलेक जोडी ‘अपने’, ‘यमला पगला दीवाना’, ‘क्षत्रिय’ यांसारख्या चित्रपटात एकत्र झळकली आहे.

याव्यतिरिक्त सनीबाबत बोलायचं झालं, तर तो त्याच्या ऍक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. सनीने आपले डायलॉग्ज आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत ‘गदर’, ‘यमला पगला दीवाना’, ‘अपने’, ‘बॉर्डर’, ‘जीत’, ‘घातक’, ‘घायल’, ‘त्रिदेव’, ‘पाप की दुनिया’ आणि ‘बेताब’ यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.

मागील काही काळापासून तो चित्रपटांपासून दूर होता. मात्र, आता सनी त्याच्या आगामी ‘गदर २’ चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत पुन्हा एकदा अमिषा पटेल दिसणार आहे. दोघांच्याही जोडीला ‘गदर’ चित्रपटात चांगली पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! ‘ये जवानी है दीवानी’ फेम ‘या’ अभिनेत्रीने दिला मुलीला जन्म, चिमुकलीचे इंस्टाग्रामवरही पदार्पण

-नुसरत जहाँने यश दासगुप्तासोबत केले लग्न? फोटो शेअर करत म्हणतेय, ‘आशीर्वाद द्या’

-KBC: जेव्हा स्टेजवर महिलेने केला होता शाहरुखचा अपमान; म्हणाली, ‘तुम्हाला मिठी मारायची हौस नाही’

हे देखील वाचा