भारीच! ‘ये जवानी है दीवानी’ फेम ‘या’ अभिनेत्रीने दिला मुलीला जन्म, चिमुकलीचे इंस्टाग्रामवरही पदार्पण


बॉलिवूडमधून सध्या अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा लग्नबंधनात अडकले. आता यानंतर ‘ये जवानी है दीवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मानेही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एवलिनच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. ती एका मुलीची आई झाली आहे. तिने सोशल मीडियामार्फत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एवलिनने आपल्या मुलीची पहिली झलकही चाहत्यांना दाखवली  आहे. आई झाल्यानंतर तिचा पती तुषान भिंडीचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. एवलिनने मुलीच्या जन्मासह तिचे इंस्टाग्राम पदार्पणही केले आहे. (Actress Evelyn Sharma Welcoms Daughter Shares First Photo of Her Newborn On Social Mdia)

मुलीने इंस्टाग्रामवर पदार्पण केले
एवलिन शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलीला हातात घेऊन जाताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भूमिका.”

एवलिनने या पोस्टसोबत मुलीचे नावही उघड केले आहे. त्यांनी मुलीचे नाव ‘आवा भिंडी’ ठेवले. एवलिन शर्माने पोस्टसह मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग केले आहे. मात्र, हे अकाऊंट सध्या एवलिन शर्मा सांभाळणार आहे.

केव्हा झाली होती पहिली भेट?
खरं तर, एवलिन शर्माने ऑस्ट्रेलियन सर्जन तुषान भिंडीसोबत याच वर्षी मे महिन्यात लग्न केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, एवलिन शर्माची तुषानसोबत पहिली भेट सन २०१८ मध्ये झाली होती. अभिनेत्री एली अवरामने दोघांची ओळख करून दिली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. सन २०१९ मध्ये, तुषानने सिडनीच्या हार्बर ब्रिजवर एवलिनला तिच्या गुडघ्यांवर प्रपोज केले. दोघांनी २०१९ मध्ये एंगेजमेंट केली आणि २०२१ मध्ये एकमेकांसोबत सात फेरे घेतले.

‘या’ चित्रपटात झळकलीय अभिनेत्री एवलिन शर्मा
एवलिन आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात झळकली आहे. तिने ‘फ्रॉम सिडनी विद लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त ती रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातही झळकली आहे. यामध्ये तिच्या कामाला खूप पसंत करण्यात आले.

विशेष म्हणजे ती, सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसरत जहाँने यश दासगुप्तासोबत केले लग्न? फोटो शेअर करत म्हणतेय, ‘आशीर्वाद द्या’

-KBC: जेव्हा स्टेजवर महिलेने केला होता शाहरुखचा अपमान; म्हणाली, ‘तुम्हाला मिठी मारायची हौस नाही’

-खराब टीआरपीचा बळी ठरतोय ‘बिग बॉस १५’, जुनी बाजी खेळत निर्मात्यांनी आखली ‘ही’ योजना


Latest Post

error: Content is protected !!