‘कौन बनेगा करोडपती’ हा टेलिव्हिजन जगतातील सर्वोत्तम शोपैकी एक मानला जातो. या शोने आतापर्यंत लाखो लोकांचे नशीब बदलले आहे. तुम्ही अनेकदा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चनला होस्ट करताना पाहिले असेल. पण या शोचा तिसरा सीझन बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान होस्ट करत होता आणि यादरम्यान एक स्पर्धक त्याच्यासमोर आली, जिने त्याचा खूप अपमान केला.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभच्या जागी शाहरुख खान दिसला, तेव्हा शोने वेगळाच रंग घेतला. मात्र, एकदा त्याला एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले होते, जेव्हा एका स्पर्धकाने सर्वांसमोर त्याचा अपमान केला होता. स्पर्धक म्हणून बसलेली महिला प्रोफेसर शाहरुखशी खूप कडक वागली होती. काही प्रसंगी अभिनेत्याने तोंडाला कुलूप लावणेच योग्य समजले. (kbc when a woman professor insulted shahrukh khan in kaun banega crorepati)
खरेतर, शाहरुख खान या शोमध्ये येणाऱ्या बहुतेक स्पर्धकांना मिठी मारत असे. हे प्रकरण २५ एप्रिल २००७ चे आहे. केबीसीचा तिसरा सीझन शाहरुख होस्ट करत होता. शोमध्ये त्याच्यासमोर एक महिला प्रोफेसर होती. तिने किंग खानला सांगितले की, ती त्याचे चित्रपट पाहते, पण आधी त्याला चांगला अभिनेता मानत नव्हती. नंतर तिने शाहरुखची स्टाईल शम्मी कपूरसारखीच असल्याचे सांगितले आणि त्याच्या डोळ्यांचे कौतुकही केले.
शोमध्ये जेव्हा तिची लाईफ लाइन संपते, तेव्हा शाहरुख खान तिला स्वतःला मिठी मारण्याचा पर्याय (मस्करीत) देतो. प्रत्युत्तरात महिला प्राध्यापिका म्हणते की, “मला तुला मिठी मारण्याची आवड नाही. मला इथे खेळ थांबवायचा आहे.” शाहरुख पुढे म्हणाला, “तू किती सुंदर खेळलीस, त्यामुळे मला मिठी मारण्याची आहे.” शो थांबवल्यानंतर, शाहरुख तिच्या आईकडे गेला आणि विजयी रकमेचा चेक महिला प्राध्यापकाच्या आईला दिला आणि तिला मिठी मारली.
ती महिला स्पर्धक शाहरुख खानशी खूप कठोरपणे वागली, परंतु अभिनेत्याने आपला संयम सोडला नाही. तो शोमध्ये तिच्याशी अतिशय सौम्यपणे वागला. या एपिसोडनंतर चाहत्यांच्या नजरेत शाहरुख खानसाथी आदर आणखीच वाढला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य
-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…