Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड फोटोत हसणारी ‘ही’ मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि आहे सुपरस्टारची आई, ओळखलं का?

फोटोत हसणारी ‘ही’ मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि आहे सुपरस्टारची आई, ओळखलं का?

बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, त्यांना ओळखण्याचे आव्हान दिले जात आहे. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या स्टारचा फोटो ओळखतात. मग लाखो प्रयत्न करूनही बदललेल्या लूकमधील कलाकार ओळखू शकत नाहीत. या व्हायरल फोटोमध्ये एक गोंडस हसणारी मुलगी दिसत आहे. तिचा साधा लूक पाहून कोणीही कल्पना करू शकत नाही की, ती बॉलिवूडची सर्वात मोठी डान्सर आहे. अशी डान्सर बॉलिवूडमध्ये आजपर्यंत कधीच घडली नाही. फोटोत दिसणारी ही मुलगी हेलन (Helen) आहे. त्यांचे खरे नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या खास डान्सर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ५०० हून अधिक चित्रपट केले आहेत.

बर्मामध्ये २१ नोव्हेंबर १९३८ रोजी जन्मलेल्या हेलन यांचे वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मी होती. त्यांना एक भाऊ रॉजर आणि बहीण जेनिफर आहे. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. हेलन यांनी त्यांचे शिक्षण कोलकात्यात पूर्ण केले. पण त्यांना त्यांचे शिक्षण मधेच सोडावे लागले. खरं तर, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.

हेलन यांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्याशी लग्न केले, पण लवकरच हे लग्न तुटले. यानंतर हेलन यांनी सलमानचे वडील सलीम खान यांच्याशी लग्न केले. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan), सोहेल खान (Sohail Khan), अरबाज खान (Arbaaz Khan) आणि अलविरा खान (Alvira khan) ही त्यांची सावत्र मुले आहेत.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातून हेलन यांना मोठी संधी मिळाली. त्यांना ग्रुप डान्समध्ये संधी मिळाली. हेलन यांनी गुरु दत्त यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका गीता दत्त यांच्या अनेक उत्तमोत्तम गाण्यांवर परफॉर्मन्स दिला. २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा