…म्हणून समंथाने शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी दिला नकार, जाणून घ्या कारण

साऊथची क्वीन समंथा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिचा पती नागा चैतन्यसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटानंतर आता समंथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. ती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी खूप काम करत आहे. मात्र, कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समंथाने शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिला होता.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख खान दिग्दर्शक एटलीच्या ऍक्शन चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटासाठी समंथाकडे संपर्क साधण्यात आला होता. या चित्रपटाला अद्याप कोणतेही अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. तर त्याला ‘लायन’ म्हटले जात आहे. (this is why samantha rejected atlee shah rukh khan movie)

का दिला नकार?
शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी समंथाला संपर्क साधण्यात आला. पण तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. याचं कारण म्हणजे, ती नागा चैतन्यसोबत कुटुंब वाढवण्याचा विचार करत होती. त्यानंतर अभिनेत्री नयनताराला या चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला आणि तिने यासाठी हो म्हटले. नयनताराने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. ती सध्या मुंबईत चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शाहरुख आणि नयनतारा जेव्हा पुण्यात चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा सेटवरून दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. शाहरुख आणि नयनतारा यांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला होता.

View this post on Instagram

A post shared by nayanthara???? (@nayantharaaa)

एटलीसोबत केलंय काम
एटली आणि समंथा यांच्यात चांगले व्यावसायिक संबंध आहे. तिने त्याच्यासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. एटलीच्या चित्रपट ‘थेरी’ आणि मर्सलमध्ये समंथाने मुख्य भूमिका साकारली होती.

लवकरच बॉलिवूडमध्ये ठेवणार पाऊल
दक्षिणेत धमाल केल्यानंतर समंथाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकले आहे. ती वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’मध्ये दिसली होती. यातील तिचा अभिनय चांगलाच पसंत केला गेला. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. समंथा लवकरच तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करणार आहे. ती आजकाल तिच्या फिटनेसकडेही खूप लक्ष देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खुश खबर! नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समंथाने दिली आनंदाची बातमी

-आर्यन खानने जेलमध्ये एनसीबी संचालक समीर वानखेडेंना दिले ‘हे’ वचन; ऐकून शाहरुखलाही वाटेल अभिमान

-नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

Latest Post