Thursday, April 25, 2024

आर्यन खानने जेलमध्ये एनसीबी संचालक समीर वानखेडेंना दिले ‘हे’ वचन; ऐकून शाहरुखलाही वाटेल अभिमान

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या मुंबई क्रूझ पार्टीमध्ये अं’मली पदार्थाच्या पार्टीमध्ये पकडला गेल्याने सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणातून त्याला जामीन मिळेल की नाही या गोष्टीची चर्चा संपूर्ण भारतात चालू आहे. अशातच आर्यन खानने त्याच्या आयुष्यात सगळ्या व्यसनापासून दूर राहून देशाचा एक जबाबदार नागरिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेलमध्ये एनसीबी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाद्वारे त्याचे समुपदेशन केले जात आहे. या मध्येच आर्यन खान असे काही बोलला की, ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.

आर्यनने सांगितले की, “मी शप्पथ घेतो की, मी जेलच्या बाहेर जाऊन अं’मली पदार्थाला हात देखील लावणार नाही.” आर्यनसोबत आणखी सात जण असे आहेत ज्यांचे वय ३० वर्षापेक्षाही कमी आहे. ज्यांना अं’मली पदार्थापासून सुटका करण्यासाठी एनजीओकडून मदत केली जात आहे.

या युवकांना एनसीबी संचालक समीर वानखेडेंसह एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अं’मली पदार्थांचे दुष्परिणाम सांगितले आहेत. यामुळे व्यक्ती, समाज आणि देशाला होणारे नुकसान त्यांना सांगितले जात आहेत. तसेच त्यांना जागरूक केले जात आहे. हा एनसीबीच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या समुपदेशन प्रक्रियेत आर्यनने खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावेळी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याने अत्यंत काळजीपूर्वक ऐकली. यावेळी त्याने त्याचे मत मांडताना सुधारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Mumbai cruise drugs case accused Aryan Khan taking counseling by NCB in Arthur road jail)

आर्यन खानने समुपदेशनादरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना खूप काळजीपूर्वक ऐकल्या तसेच सांगितलेल्या सगळ्या नियमांचे पालन देखील केले. तसेच त्याने या सगळ्या प्रकारापासून नंतर लांब राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आर्यनने समाजातील गरीब आणि वंचित लोकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या समुद्रामध्ये शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूज शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अं’मली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आली आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या जामिनासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. तरी देखील त्याला अजून जामीन मिळाला नाही

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

-Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने

-‘अधूरा’चा फर्स्ट लूक रिलीझ: शेवटचे एकत्र दिसणार ‘सिडनाझ’, चाहत्यांना अनावर झाल्या भावना

हे देखील वाचा