Saturday, September 30, 2023

“वाट्टेल ते बोलण्याचा परवाना…” रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

नुकतेच मराठीमधील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवींद्र महाजनी यांनी मराठीमध्ये ७० आणि ८० च्या दशकात अक्षरशः मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी क्षेत्रातील हँडसम अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र रवींद्र महाजनी यांचा मृत्यू एकांतात झाला. ते त्यांच्या तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मात्र जेव्हा ही निधनाची बातमी समोर आली तेव्हा सर्वानाच मोठा धक्का बसला. रवींद्र महाजनी हे जेवढे ९० च्या काळात प्रसिद्ध होते. तेवढेच ते आजच्या पिढीला देखील आवडायचे. त्यांचे जुने सिनेमे आजही सर्वांसाठी मनोरंजनाचे उत्तम पर्याय म्हणून आवडीने पाहिले जातात. मात्र जेव्हा त्यांचे निधन कशा पद्धतीने झाले हे समोर आले तेव्हा सर्वांनाच खूपच वाईट वाटले. निधनाच्या दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर अनेकांनी रवींद्र महाजनी यांच्या निधनापेक्षा त्यांच्या निधन झालेल्या परिस्थितीबद्दल बोलणे आणि सांगणे जास्त सोयीस्कर समजले आणि यावरून त्यांच्या मुलाला कुटुंबाला दोष देण्यास सुरुवात केले. यामुळे अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अशा लोकांना चांगलीच फटकार लावली आहे.

हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आपण कोण झालो आहोत?
काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी Social Media वरून नंतर news channel मधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे! Ofcourse बातमी देणाऱ्यांची आता ती style च झालीए बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची! त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच.
पण त्या बातमीवर आलेल्या comments वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक! त्यांच्या मुलाबद्द्ल, पत्नीबद्दल!
असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण!
ज्या Hero ला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला!
‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते!
Gashmeer Mahajani आधीच इतका struggle करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry!
And Strength to you, boy!
Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास!”

हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी तिला योग्य असल्याचे सांगत तिला पाठींबा दिला आहे. दरम्यान हेमांगीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती सध्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे.

अधिक वाचा- 
काय सांगता! अभिनेता अभिषेक बच्चन करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण
मोठी बातमी टीव्ही अभिनेत्याने एका व्यक्तीवर झाडली गोळी, अभिनेता पोलिसांच्या ताब्यात

हे देखील वाचा