Friday, June 14, 2024

“…मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते” मराठी अभिनेत्रीच्या ‘त्या’ सुंदर पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष

आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध झालेली आणि सोशल मीडिया पोस्टमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. राधिकाने तिच्या लहान मात्र महत्वाच्या भूमिकांमधून आपली चांगलीच छाप प्रेक्षकांवर पडली आहे. राधिका एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम दिग्दर्शिका देखील आहे. मध्यंतरी तिला तिच्या बालनाट्यासाठी महानगरपालिकेचा हॉल मिळावा यासाठी तिने प्रयत्न केले. मात्र तिला निराशा मिळाल्यानंतर तिने पोस्ट टाकली आणि त्यानंतर लगेच तिला हॉल मिळाला आणि तिचे बालनाट्य यशश्वी झाले.

राधिका तिचे विचार अतिशय स्पष्टपणे आणि बिनधास्त व्यक्त करत असते. अशातच आता पुन्हा एकदा तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती कमालीची चर्चेत आली आहे. नुकतीच राधिकाने अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासोबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. शरद पोंक्षे यांनी याबद्दल पोस्ट शेअर करत याची माहिती दिलीच होती. मात्र आता राधिकाने याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे.

राधिकाच्या या पोस्टची सध्या कमालीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “छडी लागे छम छम”च्या काळातली माणसं
“वयम् मोठम् खोटम्” वाटायला लावणारी
इंदिरा आजी १०३ तर भिडे गुरुजी ९०
सांगली मिरजकडे राहणारी ही पिकलेल्या आंब्या सारखी गोड आणि चिरोट्यांच्या पापुद्र्यांसारखी त्यांची कांती, साजूक तुपाचे पावित्र्य आणि वागण्या बोलण्यातला ओलावा? तेवत असलेल्या समयीच्या वातीतला. वटवृक्षाच्या झाडासारखी मातीत घप्प मुळांचे गोफ गुंफित तटस्थ उभी. त्यांना पारंब्या तरी किती!
त्यांच्या सावलीत काही क्षण वेचता आले, पारंब्यांवर झुलता आले.
आजी होती मऊ मऊ. तर गुरुजींच्या नजरेतून एकही गोष्ट सुटली नाही. विलक्षण!
मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते.
करं जोडोनी मागते मी तुजला
“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा””

राधिकाच्या ही अतिशय सुंदर पोस्ट गाजत असताना त्यावर कमेंट्स करत नेटकाऱ्यानी तिच्या लिखाणाचे खूपच कौतुक केले आहे. सोबतच काहींनी तर तिला पुन्हा अभिनय कर असे देखील सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘रामायण’ फेम ‘सीता’चे 33 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत मिळाली दमदार व्यक्तिरेखा

पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा