‘इंडियन आयडल’ या रियॅलिटी शोमध्ये दर आठवड्याला नवनवीन सेलिब्रेटी येत असतात. यावेळी जया प्रदा (jaya prada) इंडियन आयडलच्या सेटवर आल्या होत्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या शूटिंग दरम्यानच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यातलीच एक आठवण म्हणजे जया प्रदा म्हणाल्या, सुपरस्टार धर्मेंद्र त्यांच्यासोबत रोमँटिक सीन करताना त्यांना घाम फुटायचा.
धर्मेंद्रने त्यांचा काळ खूप गाजवला आहे. धर्मेंद्र यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ते त्या काळात लाखो दिलांची धडकन झाले होते. सिनेसृष्टीतल्या प्रत्येक अभिनेत्रीबरोबर त्यांनी स्क्रिन शेअर केली आहे. अजूनही धर्मेंद्र यांचे फॅन -फॉलोवर्स कमी झालेले नाही. प्रत्येक सिनेमाच्या दरम्यान ते प्रत्येक अभिनेत्रीबरोबर फ्लट करायचे. पण जया प्रभा म्हणाल्या की, “माझ्याबरोबर रोमांटिक सीन करताना त्याला घाम फुटायचा. इंडियन आयडलच्या रंगमंचावर अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.”
जया प्रदा या मूळच्या आंध्रप्रदेशच्या आहे. जया प्रभा या उत्तम कुचीपुडी डान्सर आहे. जया यांनी आत्तापर्यंत साधारणता १२५ सिनेमे केले आहेत. त्यात मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड या सर्व भाषेत काम केले आहे. त्यांनी मराठी इंडस्ट्रीतही काम केलेले आहे. त्यांनी १९४४ मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर जाऊन तेलगू डीसम पार्टी यात सामील झाल्या. तेव्हापासून त्यांच्या पॉलिटिकल करिअरला सुरुवात झाली. २००४ ते २०१४ त्या रामपूरकडून मेंबर ऑफ पार्लमेंट होत्या. ‘सत्यजित रे’ हे त्यांना इंडियन सिनेमामधला सगळ्यात सुंदर चेहरा म्हणायचे.
जयाप्रदा यांची फिल्म इंडस्ट्रीत येण्याची एक वेगळी गोष्ट आहे. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या डान्स करत होत्या. डान्स होता तीन मिनिटाचा प्रेक्षकांमध्ये एक दिग्दर्शक बसले होते. त्यांचा डान्स बघताच त्यांनी ‘भूमी कोसम’ या तेलगू सिनेमात त्यांना तीन मिनिटांचा डान्स दिला. अशाप्रकारे तिच्या इंडस्ट्रीतल्या करिअरला सुरुवात झाली. तेव्हा त्यांना त्या कामाचे दहा रुपये मिळाले होते. पण तो चित्रपट जया प्रभा यांना खूप काही देऊन गेली. जया प्रभा मुख्यता अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची अभिनेत्री असायच्या. नांदी अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड, बेस्ट अचीव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
हेही वाचा :
सलमानसोबतच्या नात्यावर समंथा लॉकवुडने तोडले मौन, म्हणाली ‘तो चांगला माणूस आहे’
‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या चार महिन्याच्या मुलाला झाला कोरोना, सोशल मीडियावरून दिली माहिती
वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर ऋतिक रोशनच्या घरी आला चिमुकला पाहुणा, अभिनेत्याने शेअर केली झलक