Thursday, November 13, 2025
Home साऊथ सिनेमा ‘या’ सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

‘या’ सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलगू इंडस्ट्रीमधील विनोदी अभिनेता चालाकी चंटी याला २२ एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार चालू आहे. मात्र यापेक्षा अधिक त्याच्या तब्येतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. त्याच्या तब्येतीबद्दल त्याच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीने मीडियासमोर येऊन काही सांगितले नाही.

मीडियामधील माहितीनुसार चालाकी चंटी यांना छातीत त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेले गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. सांगितले जात आहे की, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र अजूनही हॉस्पिटलमधून येणाऱ्या मेडिकल अपडेटची सर्व पाहत आहे.

चालाकी चंटी बद्दल आलेल्या या बातमीमुळे त्याचे फॅन्स चिंतेत असून त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. चालाकी चंटी हा त्याच्या उत्तम कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. त्याला मोठी फॅन फॉलोविंग असून, तो टॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या चालाकी चंटी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘जबरदस्थ’मध्ये दिसत आहे. चालाकी चंटीचे खरे नाव विनय मोहन असे आहे.

चालाकी चंटीला अर्थात विनय मोहनला खरी ओळख ‘जबरदस्थ’ या शोने मिळवून दिली. त्याने त्याच्या प्रतिभेने आणि त्याच्या कॉमिक टायमिंगने लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवली. त्याने तेलगू बिग बॉसमध्ये देखील भाग घेतला होता. या शोच्या नागार्जुनने होस्ट केलेल्या सहाव्या पर्वात तो दिसला होता. मात्र तो या शोमधून लवकरच बाहेर पडला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…

हे देखील वाचा