टीव्हीवर अनेक हिंदी, मराठी मालिका सुरु होतात आणि काही काळाने बंद देखील होतात. मालिका जेव्हा बंद होतात तेव्हा अनेकदा आपल्या कानावर एक वाक्य पडते आणि ते म्हणजे ‘मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद नसल्याने मालिका बंद झाली,’ हे ऐकून बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, मालिकावाल्यांना कसे समजते प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी आहे की जास्त? यासाठी ‘टीआरपी’ म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. याच टीआरपी वरून मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे समजते. प्रत्येक आठवड्याला टीआरपीची आकडेवारी येते आणि कोणती मालिका सर्वात वर आहे आणि कोणती मालिका खाली यात समजते. आज आपण या आठवड्याच्या टीआरपीवरून कोणती मालिका पुढे आहे आणि कोणती मागे हे जाणून घेऊया.
१. तारक मेहता का उल्टा चष्मा
मागील १३ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण पसरले जाते. यावेळी ही मालिका अव्वल स्थानावर आहे.
२. अनुपमा
रुपाली गांगुलीची ‘अनुपमा’ही मालिका आपला दबदबा कायम राखून आहे. या मालिकेमध्ये अनुज कपाडियाच्या एंट्रीने एक नवीन मालिकेला एक नवीन वळून सुरू होताना दिसत आहे. ही मालिका सातत्याने पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर आहे.
३. कौन बनेगा करोडपती १२
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या या मोठ्या, लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा रियॅलिटी प्रश्नमंजुषा शोने येताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोने थेट तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
४. द कपिल शर्मा शो
प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि सर्वांचे टेन्शन दूर सरणारा शो म्हणजे कपिल शर्मा शो नुकताच सुरु झालेल्या या शोला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. शोने थेट या यादीत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
५. सुपर डान्सर ४
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये झालेल्या पुनरागमनाबरोबरच या डान्सिंग रियॅलिटी शोमध्ये पुन्हा एकदा जीव आला आहे. नेहमीप्रमाणे, या शोने या यादीत पहिल्या पाच मध्ये स्थान कायम राखले आहे.
६. डान्स दिवाने ३
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा रियलिटी शो ‘डान्स दिवाने’ या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या शोची या आठवड्याला यादीत थोडीशी घसरण झाली आहे.
७. ये रिश्ता क्या कहलाता है
अभिनेता मोहसीन खान आणि अभिनेत्री शिवांगी जोशी यांची मुख्य भूमिका असणारी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका देखील या यादीत सामील आहे. ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे.
८. कुमकुम भाग्य
गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेची क्रेझ अजूनही तशीच आहे. या मालिकेने या यादीत आठव्या क्रमाकांचे स्थान मिळवले आहे.
९. ये है चाहतें
‘ये है चाहते’ हा शो ‘ये है मोहब्बतें’ चा एक स्पिन-ऑफ आहे. जे या वेळी यादीत नवव्या स्थानावर आहे.
१०. खतरों के खिलाडी पर्व ११
या यादीत शेवटचे स्थान ‘खतरों के खिलाडी पर्व ११’ या शोला मिळाले आहे. त्याचबरोबर शोचा टीआरपी देखील खूप कमी झाला आहे. हा शो या वेळी १० व्या क्रमांकावर असून यादीत तळाशी आहे.
दर आठवड्याला या यादीत बदल होत असतात. मालिकांचे स्थान देखील वर खाली होते. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आपल्या आवडत्या मालिका कोणत्या स्थानावर आहे हे पाहायला अनेकांना आवडत असते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन
-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी
-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे