Saturday, June 15, 2024

‘ज्यांना पुरस्कार मिळत नाही यांच्यासाठीच पुरस्कार महत्वाचे नसतात’, म्हणत अभिषेक बच्चनने मांडले पुरस्कारांवर मत

अभिनेता अभिषेक बच्चन एक प्रभावी अभिनेता आहे. त्याच्या वाट्याला आलेल्या सर्व भूमिका त्याने अतिशय उत्तम पद्धतीने वठवल्या. अतिशय मेहनती आणि हुशार अभिनेता म्हणून अभिषेक बच्चन ओळखला जातो. अभिषेकने चित्रपटांसोबतच वेबसिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील त्याच्या कामाने भरपूर नाव कमावले. अभिषेक ‘ब्रीद इनटू द शॅडोज’, ‘द बिग बुल’ या काही कलाकृतींमधून त्याने स्वतःला उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केले.

आता अभिषेक बच्चन लवकरच ‘बॉब बिस्वास’मध्ये दिसणार आहे. विद्या बालनचा सुपरहिट सिनेमा असलेल्या ‘कहाणी’मध्ये बॉब बिस्वास ही भूमिका होती. या सिनेमात एलआयसी एजेंट असतो आणि पार्ट टाईम किलर असतो. आता या धमाकेदार भूमिकेला अभिषेक बच्चन पडद्यावर साकारणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिषेकने पुरस्कारांवर देखील भाष्य केले.

या प्रमोशन दरम्यान अभिषेकला विचारले गेले की, ‘तुझ्यासाठी पुरस्कारांची काय किंमत आहे? तू तुझ्या भूमिकेसाठी स्वतःला पुरस्करांचा मानकरी समजतो का? यावर अभिषेकने सांगितले, “प्रत्येक जण कौतुक होण्यासाठीच काम करतो. पुरस्कार हा कौतुकाचेच एक रूप आहे. प्रत्येकालाच पुरस्कार पाहिजे असतो. ज्या लोकांना पुरस्कार मिळत नाही तेच लोकं पुरस्कार महत्वाचे नसतात असे म्हणतात.”

पुढे अभिषेक म्हणाला, “पुरस्कार प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जर कोणी असे बोलले की माझा पुरस्कारांवर विश्वास नाही तर ती व्यक्ती खोटं बोलत असते. कारण त्यांना पुरस्कार मिळत नाही. आपण सर्व कलाकार आहोत. जेव्हा कलाकारांना पुरस्कार मिळतात आणि त्यांची वाहवाही होते. त्यामुळे पुरस्कारांपेक्षा काहीच मोठे नसते. आम्ही कौतुक होण्यासाठी खूप काम करतो. आम्हाला आर्थिक हातभार देखील लागतो. कलाकरांना त्यांच्या कौतुकामुळे आनंद मिळतो. आम्ही कौतुक होण्यासाठीच काम करत असतो. जर कोणाला पुरस्कार मिळत नाही तर तो प्रसिद्ध नाही किंवा त्याचे काम कोणाला आवडत नाही.”

अभिषेक बच्चनच्या ‘बॉब बिस्वास’ सिनेमाच्या ट्रेलरने त्याच्या वडिलांना अर्थात अमिताभ बच्चन यांना खूप प्रभावित केले. मुलावर गर्व असल्याचे लिहीत अमिताभ यांनी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर देखील पोस्ट केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा