टायगर श्रॉफने केली मस्क्युलर बॉडी फ्लॉन्ट; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल


मनोरंजनाच्या क्षेत्रावर नजर टाकली, तर सीनियरपासून ज्यूनिअरपर्यंत सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसची खूपच काळजी घेतात. योग्य डाएट आणि व्यायाम करत कलाकार त्यांचा फिटनेस जपतात. योग्य शरीर मिळवण्यासाठी कलाकार अनेक तास जिममध्ये घालवतात. हेच कलाकार अनेकदा त्यांच्या व्यायामाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे रफ एँड टफ वर्कआऊट पाहून आपल्याला त्यांचा हेवा वाटल्यावाचून राहत नाही.

आजच्या काळातील आघाडीचा अभिनेता म्हणून टायगर श्रॉफ ओळखला जातो. इंडस्ट्रीमध्ये चांगली पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेला टायगर देखील त्याच्या फिटनेसबाबतीत खूपच सजग आणि शिस्तबद्ध आहे. नुकताच त्याचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टायगर त्याची मस्क्युलर बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

टायगर त्याची बॉडी उत्तम राखण्यासाठी जिममध्ये नेहमीच घाम गळताना दिसतो. इंस्टाग्राम स्टेटस स्टोरीवर त्याने त्याचा पुल अप्स करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. डेनिम जीन्स घातलेला टायगर या व्हिडिओमध्ये जिममध्ये असलेल्या बारवर पुल अप्स करत आहे. त्याचा हा व्हिडिओ आणि त्याची मस्क्युलर बॉडी त्याच्या फॅन्ससोबतच इतरांना देखील प्रेरणा देणारी आहे.

टायगरने यापूर्वी त्याचा हवेत उडून एकसोबत चार किक मारताना दिसला होता. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आले होते. टायगर हा अमेझिंग बॉडी आणि गुड फिजिकचा धनी आहे. आपला फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी त्याने स्वतःला काही नियम आणि शिस्त लावली आहे. टायगर किक बॉक्सिंगसाठी देखील ओळखला जातो. मार्शल आर्ट्समध्ये टायगरने अनेक पदवी संपादन केल्या आहेत.

टायगर नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये देखील बऱ्याचदा त्याची बॉडी आणि त्याचे वर्कआऊट करताना आपल्याला दिसतो. टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो लवकरच ‘गणपत’ या त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन देखील दिसणार असून, टायगर आणि क्रिती या सिनेमाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा सोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संजू बाबाची पत्नी वयाच्या ४२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ केला शेअर

-‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त


Leave A Reply

Your email address will not be published.