अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy) बर्याच दिवसांपासुन तिच्या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आहे. या शाही विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा रंगली होती. लग्नामध्ये मौनीच्या सुंदर आणि मनमोहक सौंदर्याचे प्रचंड कौतुक झाले होते. लग्नाच्या गडबडीत बरेच दिवस मनोरंजन क्षेत्रापासून लांब असलेल्या मौनीचे धमाकेदार नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या दमदार अभिनयासाठी आणि घायाळ करणार्या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मौनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. त्यावरुन तिने आपल्या लग्नाचे आणि हनिमूनचे सुंदर फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले होते. आता लग्नाच्या धामधुमीतून बाहेर पडताच मौनीच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला चाहत्यांचा प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या गाण्यात मौनीसोबत अभिनेता टायगर श्रॉफसुद्धा ( Tiger Shroff) दिसत आहे. हे एक पंजाबी गाणे आहे. या गाण्यातून मौनी रॉय आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे गाणे खुद्द अभिनेता टायगर श्रॉफने गायले आहे.
टायगर श्रॉफ आणि मौनी रॉयचे हे याने नवीन सध्या सगळीकडे चर्चेत आहे. यामध्ये टायगर आणि मौनीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच थक्क केले आहे. या गाण्याबद्दल आपले अनुभव सांगताना टायगर श्रॉफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की “हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काम होते. माझे पहिले पंजाबी गाणे, तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा.” या गाण्याला प्रेम आणि हर्षदीप यांनी लिहले असून, अवघ्या काही मिनिटांत गाण्याला लाखो लोकांनी पाहिले आहे.
या गाण्यावर टायगरचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर एका चाहत्याने “काय केमिस्ट्री आहे” असे लिहले आहे तर आणखी एकाने “तुमचे पंजाबी उच्चार छान आहेत, मग तुम्ही बोलत का नाही ” असे म्हणत टायगरचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर आणखी एकाने “तुम्ही आमचे मनोरंजन करायला कधीच कमी पडत नाही” असे म्हणत अभिनेत्याचे कौतुक केले आहे. तर यावर काही जणांनी हे गाणे कॉपी असून चांगल्या गाण्याची वाट लावल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सोबतच स्वतःचेही काहीतरी बनवत जा,” असाही सल्ला दिला आहे. थोडक्यात टायगरच्या या गाण्यावर चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा –