Friday, April 19, 2024

भारीच की! लग्नाला एक महिना पूर्ण होताच अभिनेत्री मौनी रॉयने पतीसोबतचे फोटो केले शेअर

अभिनेत्री मौनी रॉयने यावर्षी सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली. मौनी तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. ‘नागिन’ फेम ही अभिनेत्री तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यांच्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले. आता मौनीने तिचे मलयानी आणि ब्रायडल लूकमधील फोटोही शेअर केले आहेत. त्यासह मौनीने तिचे आणि सूरजचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर सूरज आणि मौनी दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत.

अलिकडेच मौनी (Mauni Roy) तिच्या पतीसह आध्यात्मिक गुरुचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. गुरूला भेटल्यानंतर मौनीने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यासोबतच त्यांनी आश्रमात घालवलेल्या क्षणांचा एक व्हिडिओही शेअर केला होता. मौनी रॉय आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) त्यांच्या नवविवाहित आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरूंना भेटायला आले होते. फोटोंमध्ये मौनी आणि सूरज गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसत होते. यावेळी सूरजने कुर्ता परिधान केला होता, तर मौनी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. हे जोडपे सद्गुरूंच्या चरणांजवळ बसून त्यांचा आशीर्वाद घेत होते. यादरम्यान मौनीनेही तिचे डोके गुरूच्या मांडीवर ठेवले होते. लग्नानंतर मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी त्यांच्या हनीमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जे चाहत्यांना खूप आवडले होते.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या लग्नाला मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानी, नेहा स्वामी बिजलानी, वेनेसा वालिया आणि इतर अनेकजण उपस्थित होते. मल्याळी आणि बंगाली अशा दोन वेगवेगळ्या रितीरिवाजांनी त्यांचे लग्न झाले होते. मौनी आणि सूरज २०१९ मध्ये पहिल्यांदा दुबईत भेटले होते. तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सूरज नांबियारचा जन्म कर्नाटकातील बंगलोर येथे एका जैन कुटुंबात झाला. तो दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आहे.

टेलिव्हिजनसह चित्रपटांमध्येही काम केलेल्या मौनी रॉयला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मौनीने ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत सतीची भूमिका साकारली होती. तेव्हापासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. त्यानंतर ‘नागिन’ या मालिकेतही काम केले. प्रेक्षकांनीही या मालिकेला इतकं प्रेम दिलं की, ही मालिकाही हिट झाली.

https://www.instagram.com/p/CaeA9AMJMEB/?utm_source=ig_web_copy_link

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘डान्स इंडिया लिटिल मास्टर’ या डान्स रियॅलिटी शोचे परीक्षण करत आहे. या शोमध्ये मौनीसोबत सोनाली बेंद्रे आणि रेमो डिसूझा देखील असतील. अभिनेत्री असण्यासोबतच मौनी एक उत्तम डान्सर देखील आहे.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा