Friday, January 27, 2023

शाॅकिंग! प्रसिद्ध टिक-टाॅक स्टारचं अवघ्या 21व्या वर्षी निधन, कलाविश्वात शोककळा

इंडो-कॅनडियन टीक-टॉक स्टार मेघा ठाकूरचं वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी निधन झाले. तिच्या आई- वडिलांनी इस्टाग्रामवर पाेस्टद्वारे ही माहिती दिली. टीक -टाॅकवर 9लाखाहून अधिक फाॅलाेअर्स असणाऱ्या मेघाचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र शाेक व्यक्त केला जात आहे. ती मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी होती.

मेघा ठाकूरचे 24 नोव्हेंबर 2022 च्या पहाटे अचानक झाले निधन
इंस्टाग्रामवर दु:खद बातमी शेअर करताना मेघा (megha thakur) हिच्या पालकांनी लिहिले की, “आम्ही जड अंतःकरणाने ही दुःखद बातमी जाहीर करत आहोत. आमची दयाळू, काळजी घेणारी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूर हिचे 24 नोव्हेंबर 2022 च्या पहाटे अचानक निधन झाले. मेघा तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम करायची. मेघावर तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच कायम ठेवा. तुमच्या प्रार्थनेतून आणि आशीर्वादातून तिला एक नवीन प्रवासाचा मार्ग सापडेल, अशाप्रकारे मेघाच्या आई – वडिलांनी तिच्या आठवनीला उजाळा देत तिला श्रद्धांजली अर्पण केली. मेघा ठाकूरच्या मृत्यूचे कारण अद्याप समाेर आलेले नाही. मंगळवारी (दि. 29 नाेव्हेंबर)ला तिच्या आठवणीत श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली हाेती, ज्यामध्ये  कुटुंब आणि चाहतावर्ग यांचा समावेश हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Megha (@meghaminnd)

महाविद्यालय शिक्षण घेत असताना टिक – टाॅकवर केले पदार्पण
टीक – टाॅक स्टार मेघा ठाकूर अवघ्या एका वर्षांची असताना तिचे आई – वडिल कॅनडामध्ये राहायला गेले. मेघाने 2019मध्ये माध्यमिका शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पाश्चिमात्य विद्यापीठात प्रवेश केला. यानंतर महाविद्यालयात शिकत असताना मेघा टिक – टाॅककडे वळली. मेघाने तिचा दमादार डान्स टीक – टाॅकवर शेअर केल्यामुळे तिचा चाहतावर्ग माेठ्या प्रमाणात वाढला. प्रसिद्ध कलाकारांचाही तिच्या व्हिडिओमध्ये समावेश असायचा. (tiktok star megha thakur died age of 21 in canada her parents shared post on instagram)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘मला तर वाटतं ही…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने ‘तसले’ फोटो शेअर करताच भडकले युजर्स
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलांना ओळखलं का? त्यांनी मोठेपणी गाजवलंय बॉलिवूड, मुली अन् सुनबाईही आहेत स्टार

हे देखील वाचा