Friday, March 29, 2024

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलांना ओळखलं का? त्यांनी मोठेपणी गाजवलंय बॉलिवूड, मुली अन् सुनबाईही आहेत स्टार

बॉलिवूड गाजवणाऱ्या कलाकारांचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. सध्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो वेगाने समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे त्याकडे माध्यमांचेही लक्ष वेधले जात आहे. आताही असाच एका फोटोची चर्चा रंगली आहे. या फोटोत तीन लहान मुलं दिसत आहेत. त्यात मोठी बहीण मध्ये बसली आहे, तर मोठा भाऊ बहिणीकडे पाहत आहे आणि छोटा भाऊ हातात फोन घेतल्याचे दिसत आहे. खरं तर, ही मुलं बॉलिवूडच्या सुपरस्टारची मुलं आहेत. त्यांचे कुटुंब खूपच मोठे आहे. त्यांच्या प्रत्येक पिढीपासून त्यांच्या कुटुंबातील कुणी ना कुणी सिनेमात आपला ठसा उमटवत आहे. त्यांच्या खानदानाने बॉलिवूडमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

कदाचित तुम्ही या मुलांना ओळखळे असेल. मात्र, ज्यांनी अजूनही ओळखले नसेल, तर ही मुलं बॉलिवूडचे ‘शो मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर (Raj Kapoor) यांची मुलं आहेत. फोटोत सर्वात छोटे ऋषी कपूर (Rishi Kapoor), रणधीर कपूर (Randhir Kapoor) आणि त्यांची मोठी बहीण रितू कपूर (Ritu Kapoor) आहेत. यातील दोघेजण मोठेपणी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बनले. मात्र, त्यातील दोन मुलं आज या जगात नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

रितू कपूर
रितू या लग्नानंतर रितू नंदा (Ritu Nanda) झाल्या. त्या एक व्यावसायिक आणि विमा सल्लागार होत्या. त्यांची मुलं निखिल नंदा, नताशा नंदा आहेत, तर त्यांची सून अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा आहे. तसेच, त्यांचा नातू अगस्त्य नंदा आहे. तो ‘द आर्चीज’मधून पदार्पण करत आहे. दुसरीकडे, नात नताशा नंदाचाही व्यवसायात रस आहे. रितू यांनी 14 जानेवारी, 2020 रोजी या जगाचा निरोप गेतला होता.

रणधीर कपूर
दुसरीकडे, फोटोत दिसणारा मोठा मुलगा म्हणजेच रणधीर कपूर 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. रणधीर यांनी अभिनेत्री बबीतासोबत संसार थाटला होता. त्यांच्या दोन्ही मुली करिश्मा आणि करीना या अभिनेत्री आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

ऋषी कपूर
दुसरीकडे, फोटोतील तिसरा मुलगा ऋषी कपूर आहेत. ते अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यांचे 30 एप्रिल, 2020 रोजी निधन झाले. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर या सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीत अजूनही सक्रिय आहेत. नुकताच त्यांचा ‘जुग जुग जिओ’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. दुसरीकडे, त्यांचा मुलगा रणबीर कपूर आणि सून आलिया भट्ट हेदेखील सुपरस्टार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘वजन कमी कर जाड झालीयेस’, लेटेस्ट व्हिडिओत कंबर लचकवणाऱ्या सपनाच्या पोस्टवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट
याला म्हणतात जलवा! ‘किंग खान’ला समोरासमोर पाहून आनंदाने किंचाळली हॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा