Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या उदय सिंगने जिंकली चाहत्यांची मने, डान्स पाहण्यासाठी गावातील लोकांनी केला ‘हा’ जुगाड

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या उदय सिंगने जिंकली चाहत्यांची मने, डान्स पाहण्यासाठी गावातील लोकांनी केला ‘हा’ जुगाड

‘टिकटॉक’ या लोकप्रिय ऍपने अनेकांना ओळख दिली. अभिनयाची आवड असणाऱ्या व्यक्तींना जरी मोठ्या पदाद्यावर काम नाही करता आले नाही, तरीही त्यांनी टिकटॉकवर आपली कलाकारी दाखवून सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण केली. त्यातीलच एक म्हणजे उदय सिंग. टिकटॉकवर व्हिडिओ बनवून उदय सिंग यांनी घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. तो आता ‘डान्स दिवाणे- 3’ या शोचा भाग असणार आहे. या शोमध्ये देखील तो आपल्या डान्सने सगळ्यांना वेड लावायला सज्ज झाला आहे. उदयचा शो मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी त्याच्या गावातील लोकांनी चांगलाच जुगाड केला आहे.

उदयच्या गावातील लोकांनी पैसे जमवून त्याचा शो पाहण्यासाठी मोठा पडदा आणला, सर्व व्यवस्था केली. इतकेच नव्हे, तर गावातील सर्वांना रिक्षामधून सूचनाही देण्यात आली. अशाप्रकारे सर्वांनी एकत्र बसून त्याचा डान्स पाहिला. त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याला त्याच्या गावातील लोकांनी कशाप्रकारे डान्स पाहण्यासाठी जुगाड केला हे दाखवण्यात आल्याचे दिसत आहे.

टिक टॉकवर मिळालेल्या प्रचंड प्रेमानंतर त्याने ‘डान्स दिवाणे’ या शोमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंबईला आला. त्याचा डान्स सर्व जजला देखील खूप आवडला. डान्स दिवाणेच्या स्टेजवर त्याचे खूप कौतुक झाले.

उदय सिंग हा मध्यप्रदेशमधील नीमच या छोट्याशा खेड्याचा रहिवासी आहे. तो अत्यंत गरीब घरातून आला आहे. परंतु लहानपणापासूनच त्याला डान्सची आवड होती. घरात पैसे नसल्याने त्याने डान्सचे व्हिडिओ बघूनच डान्स शिकला. त्याने त्याचे हे डान्सचे व्हिडिओ टिकटॉकवर टाकायला सुरुवात केली. त्यामुळे खूप कमी वेळात त्याला प्रसिद्धी मिळाली.

विशेष म्हणजे यापूर्वी असंच सोशल मीडियावर एका मुलाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या मुलाचा व्हिडिओ अनेक कलाकारांनी पाहून त्याची प्रशंसा केली होती.

इतकेच नव्हे, तर ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने त्याला ‘डान्स दीवाणे- 3’ मध्ये येण्याची संधीही दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा

-Video: ‘डान्स दिवाने’च्या मंचावर मजूर मुलगा बनला स्पर्धक; संघर्षकहाणी ऐकूण माधुरी दीक्षितच्या डोळ्यात आले पाणी

-हृदयविकाराने पीडित असणाऱ्या लहान मुलांची सर्जरी करून ‘हा’ अभिनेता बनलाय माणसातील देवमाणूस

हे देखील वाचा