गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा

Bollywood Madhuri Dixit Impress With Village Boy Dance And She Announced That To Bring Him On Dance Deewane 3 Show Video Goes To Viral


बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ‘माधुरी दीक्षित’ ही इंडस्ट्रीमध्ये फक्त तिच्या अक्टिंग मुळेचं नाही तर तिच्या डान्सने देखील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. माधुरीच्या बऱ्याच सिग्नेचर पोज आहेत. ज्यांना आजही पूर्ण दुनिया कॉपी करते. माधुरी ही स्वत: एक सुपर डान्सर आहेच पण त्याचबरोबर ती इतरांच्या डान्सचे देखील कौतुक करते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरित करत असते. नुकतेच माधुरीने एका गावाकडील मुलाच्या डान्सचे भरभरून कौतुक केले आहे. त्यासोबतच त्या मुलाचा डान्स बघून तिने त्याच्यासाठी एक मोठी घोषणाही केली आहे.

सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा डान्स खूपच वायरल होत आहे. तो डान्स जेव्हा अभिनेत्री माधुरी दीक्षितने पाहिला तेव्हा त्या मुलाचं कौतुक करण्यापासून ती स्वत: ला थांबवू शकली नाही. ती त्या मुलाच्या डान्समुळे आणि त्याच्या एक्स्प्रेशनने खूपच प्रभावित झाली आहे. एवढचं काय माधुरीने त्या मुलाला ‘डान्स दिवाणे ३’ पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. माधुरीने या मुलाचा डान्स व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या धमाकेदार अंदाजाने गोविंदा सोबतच इतर अनेक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

माधुरीने हे गाणे शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहले आहे की, “वाह क्या एनर्जी हैं! पूर्ण जगाला या मुलाचा डान्स बघण्याची गरज आहे. म्हणूनच याचे जलवे जगाला दाखवायला मी याला ‘डान्स दिवाणे 3’ मध्ये घेऊन जाणार आहे.”

माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडिओचे चाहत्या सोबतच अनेक कलाकारांनी देखील कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टीने त्या मुलाचे खूप कौतुक केले आहे. या मुलाचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ती म्हणजे माधुरी लवकरच डान्स दिवाणे मध्ये जज म्हणून येणार आहे. तिने या आधी डान्स दिवाणेचे पहिले 2 सीझन देखील जज म्हणून पार पाडले आहेत. याआधी तिने ‘झलक दिख‌ ला जा’ या शोला देखील जज म्हणून काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज
-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.