Wednesday, July 3, 2024

‘टाइमपास ३’ टिझर- पालवीच्या डॅशिंग भूमिकेत ऋताने केली कमाल, २४ तासात मिळाले इतके व्ह्यूज

दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास २’ या चित्रपटांनी मराठी रसिक प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले होते. नाविण्यपूर्ण कथा, अभिनय चित्रपटातील गाजलेली गाणी आणि प्राजू दगडूचा दमदार अभिनय या कारणांमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. आता ‘टाइमपास३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (Hruta Durgule) प्रमुख भूमिका साकारली आहे. पहिल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा खूपच वेगळी असणार आहे त्यामुळेच या चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. 

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या टाइमपास ३ चित्रपटाचा टिझर नुकताच समोर आला आहे. आपल्या मित्राला जो नडेल त्याचा आपण मार्बल फोडेल, मनाचा डोअर ओपण ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून येईल सांगता येत नाही असे एकापेक्षा एक भन्नाट डायलॉग यामध्ये आहेत. त्यामुळेच हा टिझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून टिझरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. हे सगळे खतरनाक डायलॉग ऋता दुर्गुळेने म्हणले आहेत. चित्रपटात ती पालवीच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्या या डॅशिंंग, खोडकर भूमिकेत ती खूपच लक्षवेधी  दिसत आहे. त्यामुळेच या टिझरला अवघ्या २४ तासात १ मिलीयनपेक्षा जास्त विह्युज मिळाले आहेत.

अभिनेत्री ऋता दुर्गुळेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने “पालवीची स्टाईल जितकी कडक तितकाच ‘टाईमपास ३’च्या टीजरचा जलवा पन बेधडक, 1M व्ह्यूज झालेत ना पब्लिक ते पन फक्त २४ तासात” असा कॅप्शन देत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर तिने चित्रपट २९ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचेही तिने म्हणले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच दगडू आणि पालवीची भन्नाट कथा पाहायला मिळणार आहे. पालवीच्या भूमिकेत ऋता दुर्गुळे खूपच रावडी दिसत आहे. चित्रपटातील या वेगळ्या आणि प्रमुख भूमिकेसाठी ती खूपच उत्साही दिसत आहे.

हे देखील वाचा