‘डॉ. हाथी’ यांनी अभिनयासाठी सोडले होते घर; ‘या’ कारणामुळे वजन कमी करायला घाबरायचे कवि कुमार आजाद


टेलिव्हिजन वरील मालिकांना प्रेक्षक त्यांच्या घरासोबतच मनात देखील स्थान देतात. त्यांच्या आवडीच्या मालिकांमधील कलाकार तर प्रेक्षकांना आपल्या घरातलेच वाटू लागतात. टीव्हीवरील अनेक मालिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. अशीच एक सध्याच्या काळात सर्वात जास्त लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील सर्व म्हणजे सर्वच कलाकार अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत तुफान लोकप्रिय झाले आहे. त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही मालिकेतील नावानेच ओळखले जाते. या मालिकेतील असेच एक कलाकार म्हणजे ‘डॉ हाथी.’ कवि कुमार आजाद उर्फ डॉक्टर हंसराज हाथी यांनी या शोमधील त्यांची भूमिका इतक्या उत्तमतेने साकारली की, आजही कवि कुमार आजाद आपल्यात नसले तरी त्यांची भूमिका आणि अभिनय आजही सर्वांच्या मनात आहे.

या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे कवि कुमार आजाद यांची आज पुण्यतिथी. ९ जुलै २०१८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना जाऊन आज तीन वर्ष झाले, मात्र आजही प्रेक्षकांच्या मनात डॉ हाथी उर्फ कवि कुमार आजाद यांची आठवण ताजी आहे. प्रेक्षक आजही त्यांचा अभिनय विसरू शकले नाही.

त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे शोच्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांना आणि त्यांच्या फॅन्सला मोठा धक्का बसला होता. त्यांचा अभिनय लोकांना आजही खूप आठवतो. आज त्यांच्या जागी अभिनेता निर्मल सोनी ही भूमिका साकारत आहे. त्यांच्या भूमिकेलाही तुफान प्रतिसाद मिळतो, पण आजही डॉ. हाथी हे नाव उच्चारल्यावर सर्वात आधी कवी कुमार आझादच आठवतात.

तारक मेहता या शोने कवी कुमार आझाद यांना प्रसिद्धीसोबतच भरपूर दौलतही मिळवून दिली. एका मीडिया रिपोर्टनुसार, कवी कुमार एका दिवसासाठी २५ हजार फी घ्यायचे. यानुसार ते महिन्याला ७ लाख रुपये कमवायचे.

बिहारच्या सासाराम येथील रहिवासी असणारे कवी कुमार आझाद अभिनेता बनण्यासाठी घरातून पळून मुंबईत आले होते. कवी कुमार यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मात्र त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली. २०१० साली कवी कुमार आझाद यांनी त्यांचे ८० किलो वजन सर्जरी करून कमी केले होते. त्याआधी ते २०० किलोचे होते. ते नेहमी त्यांचे वजन कमी करण्यासाठी घाबरायचे. कारण त्यांना वाटायचे जर त्यांनी वजन कमी केले, तर हा शो त्यांच्या हातातून निघून जाईल.

आज तीन वर्षांनंतरही कवी कुमार आझाद त्यांच्या अभिनयाने आपल्या मनात जिवंत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी थाटला तिने संसार; तर १७ व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

-जेव्हा विवाहित गुरू दत्त पडले होते वहिदा रहमान यांच्या प्रेमात; अजूनही उलगडलं नाही त्यांच्या मृत्यूचं रहस्य

-चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात


Leave A Reply

Your email address will not be published.