×

बिनधास्त, बेधडक आणि जेंटलमॅन असणाऱ्या ऋषी कपूर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हास ठाऊक आहेत का?

बॉलिवूडमधील सर्वात मोठे घराणे म्हणजे कपूर घराणे. या खानदानाचे बॉलिवूडमध्ये खूप मोठे योगदान आहे. अगदी पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरु झालेली ही कलेची परंपरा आजतागायत अविरत सुरु आहे. याच कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीत जन्मलेले पृथ्वीराज कपूर यांचे नातू आणि शो मॅन राज कपूर यांचे चिरंजीव असणाऱ्या ऋषी कपूर   यांनी या घराण्याच्या प्रतिष्ठेला कळस चढवण्याचे काम केले. ऋषी कपूर यांनी त्यांच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. चिंटू म्हणून ओळख मिळवलेल्या ऋषी कपूर यांनी त्यांच्या काळात सिनेमाला एक वेगळी चकाकी मिळवून दिली. आज याच ऋषी कपूर यांची जयंती. १००हून अधिक रोमँटिक चित्रपट केलेल्या ऋषी कपूर यांनी २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्यबद्दल अधिक माहिती.

ऋषी कपूर (rushi kapoor) यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ साली मुंबईमध्ये झाला. त्यांनी १९७० साली त्यांनी ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमातून बालकलाकाराची भूमिका साकारत अभिनीत पदार्पण केले. १९७३ साली ‘बॉबी’ सिनेमातून तरुण अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आले. पदार्पणातच ‘बॉबी’ चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्कार पटकावल्यानंतर ऋषी कपूर यांना पुढील २५ वर्षांत एकही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही. यानंतर बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना दुसरा फिल्मफेअर मिळाला. हा सिनेमा आणि यातील गाणी तुफान गाजली.

‘बॉबी’पासून सुरु झालेला त्यांच्या अभिनयाचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला होता. राज कपूर यांचा मुलगा असूनही त्यांना करियर घडवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र त्यांनी सर्व गोष्टींवर मात करत अमाप लोकप्रियता मिळवली. ऋषी कपूर हे जेवढे त्यांच्या चित्रपटांसाठी गाजले तेवढेच ते त्यांच्या वेगवेगळ्या किस्स्यांसाठी देखील गाजले.

एक खरा जेंटलमॅन म्हणून त्यांची इंडस्ट्रीमध्ये ओळख होती. याबाबतचे अनेक किस्से आजही त्यांच्यासोबत काम केलेले कलाकार सांगतात, खासकरून अभिनेत्री. असाच एक किस्सा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी का मुलाखतीमध्ये सांगितलं होता. त्या म्हणाल्या की, “‘होगा तुमसे प्यारा कौन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पूर्ण सेटवर आग लागली होती. या आगीमधून ऋषी यांनीच मला बाहेर काढले होते. शिवाय आम्ही ‘प्रेम रोग’ या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, तेव्हा देखील सेटवर असेच काही घडले होते तेव्हा ऋषी कपूरनं यांनीच माझी मदत केली होती.”

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र असणाऱ्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकातून अनेक गोष्टी जगासमोर आल्या. अशीच गोष्ट म्हणजे ऋषी कपूर यांची सिगरेट पिण्याची सवय. ऋषी कपूर यांना सिगरेट पिण्याची खूप सवय होती. ते एका दिवसात भरपूर सिगरेट प्यायचे. ते जेव्हा जेव्हा घरी असायचे तेव्हा ते त्यांच्या मुलांना सकाळी उठल्यावर किस करायचे. मात्र एक दिवस ते सकाळी उठल्यावर त्यांच्या मुलीजवळ रिद्धिमाजवळ गेले आणि तिला किस करू लागले, तेव्हा ती म्हणाली, “मी आजपासून तुम्हाला कधीच किस करू देणार नाही कारण तुमच्या तोंडाचा वास येतो.” हे ऐकून ऋषीजी स्तब्ध झाले आणि त्यांनी त्या दिवसापासून सिगरेट पिण्याचे बंद केले. ते शेवटपर्यंत त्यांनी सिगरेटला हात लावला नाही.

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

जेव्हा ऋषी कपूर यांच्या आयुष्यात नीतू कपूर यांची एन्ट्री झाली तेव्हा ते दोघेही खूप लहान होते. मात्र नितु कपूर यांच्या रूपाने त्यांना त्यांचे खरे प्रेम मिळाले. या दोघांची लव्हस्टोरी देखील खूपच रंजक आहे. नीतू यांनी ऋषी आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगताना एका मुलाखतीमध्ये म्हटले, आम्ही खूप चांगले मित्र होतो. मी ऋषीजींना इतर मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांची मदत करायची. ती मदत तोपर्यंत असायची जोपर्यंत त्या मुली ऋषी यांच्यासोबत डेटवर येण्यासाठी तयार होत नसत. ऋषी कपूर यांना मी खूप सुंदर आणि क्यूट वाटायची. आम्ही दोघे एकमेकांना बॉम्ब म्हणून हाक मारायचे. आम्ही दोघांनी एकमेकांची खास टोपणनावं देखील ठेवली होती. ते दिवस अत्यंत सुंदर होते.” पुढे काही दिवसांनी ‘ऋषी कपूर पॅरिसला गेले होते आणि मी काश्मीरला माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. अचानक मला त्यांचा टेलिग्राम मिळाला. त्यात त्यांनी लिहिले होते की, त्यांना माझी खूप आठवण येत आहे आणि ते माझ्यावर प्रेम करतात.’ तेव्हापासून मग आमच्या मनात एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या आणि आम्ही डेट करायला सुरुवात केली.

ऋषी कपूर सोशल मीडियावरही ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते. चालू घडामोडींवर ते नेहमी त्यांचे मत मांडायचे. यासाठी अनेकदा त्यांना ट्रोल देखील केले गेले, त्यावरून वादही निर्माण झाले. मात्र तरीही ते थांबले नाही. ते त्यांचे मतं मांडतच राहिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

 

Latest Post