Wednesday, July 3, 2024

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ पुढे ढकलला! ‘या’ कारणास्तव निर्मात्यांनी घेतला अचानक निर्णय

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राईज‘ या चित्रपटाने थिएटरमध्ये धमाल केली आहे, तेव्हापासून अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या खूप वाढली आहे. पुष्पाची गाणी, अॅक्शन आणि संवाद सर्वच हिट ठरले. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल या सर्व स्टार्सनी दमदार कामगिरी केली होती. अशात आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अशी बातमी समोर येत होती की, या वर्षाच्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाचा ‘पुष्पा 2’ हा सिक्वेल येऊ शकतो. पण आता बातम्या येत आहेत की, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे आणि हा चित्रपट अद्याप प्रदर्शित होणार नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटाचे शूटिंग अचानक थांबवण्यात आले असून ‘पुष्पा द रुल’ पुढे ढकलण्यात आला आहे. शूटिंग थांबवण्याचे कारण खुद्द दिग्दर्शक सुकुमार यांनीच सांगितले आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार, आतापर्यंत जे काही शूट झाले आहे त्यावर निर्माते खुश नाहीत. त्यामुळेच विशाखापट्टणम येथे सुरू असलेले शूटिंग शेड्यूल थांबवण्यात आले आहे. आतापर्यंत या चित्रपटाशी संबंधित कोणतेही नवीन अपडेट समोर आलेले नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, ‘पुष्पा 2’ चे दिग्दर्शक सुकुमार चित्रपटाच्या कथेवर पूर्णपणे समाधानी नाहीत आणि त्यांनी त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. चित्रपट आधीच फ्लोअरवर घेण्यात आला आहे. सध्या शूटिंगचा छोटासा भाग पूर्ण झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु आता ते अपेक्षित नाही. सुकुमारला पुन्हा एकदा कंटेंट री-शूट करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्याने आतापर्यंत जे काही शूट केले आहे ते हटवायचे आहे. असे झाले तर प्रेक्षकांना ‘पुष्पा 2’ साठी खूप वाट पाहावी लागू शकते.

दरम्यान, सोशल मीडियावर एक रिपोर्ट व्हायरल होत आहे की, ‘पुष्पा 2’ हा चित्रपट यावर्षी नाही तर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग 3 महिन्यांनी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.(tollywood actor allu arjun film pushpa 2 postponed shooting stopped director sukumar not satisfied with content reports)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ते मला शिव्या देण्यासाठीच फोन करतात’ मनोज बाजपेयी यांनी ‘या’ दिग्दर्शकाबद्दल खुलासा

‘मग जा पाकिस्तानला’ म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटला नेटकऱ्यांचे सणसणीत उत्तर

हे देखील वाचा