Sunday, May 19, 2024

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘अवतार 2’ सोबत पाहायला मिळू शकते ‘पुष्पा 2’ ची झलक?

साऊथ सुपरस्टारर ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांव वेगळीच छाप सोडली आहे. त्याच्या पुष्पा: द राइज चित्रपटाने प्रेक्षकांना डोक्यावर घेतल आहे. याच्या गाण्यांने आणि डायलॉगने तर प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या भाग 2 साठी सगळेच खूप आतुरतेने वाट पाहात आहेत. पुष्पा चित्रपटाला घेऊन नुकतंच एक मोठी बातमी समोर येत आहे.

पुष्पा स्टारर अभिनेता आल्लू आर्जुन याच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाची शुटिंग सुरु झाल्यापासून चाहते खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. नुकतंच सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी चर्चांना सुरु झाल्या आहेत. माध्यमातील वृत्तानुसार डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट ‘अवतार2’ सोबतच पुष्पा2 देखिल प्रदर्शित करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं आहे. चित्रपट निर्माता पुष्पा 2 शूटचा एक व्हिडिओ प्रदर्शनासाठी तयार करत आहेत. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पा अवतारात प्रेक्षकांवर भुरळ घालण्यासाठी तयार झाला आहे. मात्र, चित्रपट दिग्दर्शकाकडून अजून कोणत्याच प्रकारची माहिती समोर आली नाही.

काही दिवसांपूर्वीच पुष्पा चित्रपटाचे सिनेमॅटोग्रॅफर याने अल्लू अर्जुनसोबत एक फोटो शेअर करत चित्रपटाविषयी माहिती देत एक पोस्ट शेर केली होती. पोस्ट शेअर करत असताना त्याने लिहिले की, “पुष्पा द राइज या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल केला होता. या चित्रपटाने साउथ सोबतच हिंदी भाषेतही चांगलाच गल्ला जमवला होता. चित्रपटाने हिंदी भाषेमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त कमाइ केली होती. याचे डायलॉगने एवढे प्रसिद्ध झाले हते की, लहान मुलांच्या तोंडातूनही सतत ऐकले जायचे.”

पुष्पा 2 चा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल माडियावर च्या चर्चा सुरु झाल्या आहेत त्या कितपत खऱ्या आहेत हे अजून समजले नाही . चित्रपट दिग्दर्शक सुकुमर यांनी अजून काहीच वक्तव्य केले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस फेम गोरी नागोरी अडकणार विवाह बंधनात; बाहेर पडताच दिली चाहत्यांना गुड न्यूज
‘मी यापूर्वी अनेक चुका केल्यात;’…म्हणत दिव्या दत्ताने सांगितला बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रवास

हे देखील वाचा