Wednesday, February 21, 2024

समांथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यने खरेदी केले नवीन घर, किंमत वाचून व्हाल थक्क

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर जवळपास 3 वर्षांनी नागा चैतन्यने नवीन घर घेतले आहे. नागाचे हे नवीन घर अतिशय आलिशान असून त्याची सुंदर रचना करण्यात आली आहे. नागा याचे नवीन घर त्यांच्या कुटुंबाच्या घराजवळ आहे. कुटुंबातील सदस्यांच्या इतक्या जवळ घर घेणे हे नागाचे त्याच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम आणि नाते दर्शवते.

माध्यमातील वृत्तांनुसार, या घराचे काम सुरू झाल्यापासून नागा चैतन्य (naga chaitany) एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहत हाेता. मात्र, घर पूर्णपणे तयार झाल्यानंतर तो त्याच्या नवीन घरी शिफ्ट झाला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण या घराची किंमत 15 कोटी आहे. यापूर्वी नागा चैतन्य आणि समांथा जुबली हिल्सच्या घरात एकत्र राहत होते. मात्र, हे जाेडपे विभक्त झाल्यानंतर आणि 2020 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, नागा चैतन्यने हे घर सोडले आणि त्याचे वडील नागार्जुन यांच्या घरी शिफ्ट झाला. गेल्या वर्षी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, नागा आणि समांथा ज्या घरात एकत्र राहत होते ते घर समांथाने विकत घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Venkat Prabhu (@venkat_prabhu)

चित्रपट निर्माते मुरली मोहन यांच्या म्हणण्यानुसार, ‘समांथा रुथने घरासाठी मार्केट रेटपेक्षा जास्त पैसे दिले होते.’ या मालमत्तेसाठी समांथाने 100 कोटी रुपये दिले असल्याचे वृत्तांचे म्हणणे आहे.

नागा चैतन्य याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ताे अखेरचा आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. अशात आता ताे व्यंकट प्रभू यांच्या ‘कस्टडी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या व्यतिरिक्त क्रिती शेट्टी, अरविंद स्वामी आणि प्रियामणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.(tollywood actor naga chaitany purchased new home at jubilee hills hyderabad after divorce from samantha price make you shcoked )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छत्रपती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, ‘या’ साऊथ अभिनेत्याच्या एंट्रीने उडाली खळबळ

परिणीती अन् राघव चढ्ढा अडकणार लग्न बंधनात? लग्नाचीही सुरू झाली चर्चा, अभिनेत्री पोहोचली डिझायनरच्या घरी

हे देखील वाचा