Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड नागा चैतन्यचे एक्सचे पत्नीबाबत माेठं वक्तव्य; म्हणाला, “समांथा ही खूप…”

नागा चैतन्यचे एक्सचे पत्नीबाबत माेठं वक्तव्य; म्हणाला, “समांथा ही खूप…”

एकेकाळी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडपे असलेले समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. दोघांनी ऑक्टोबर 2021मध्ये पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. मात्र, असे असले तरी अजूनही दोघे एकमेकांबद्दल बोलताना आणि त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतात. समंथा रुथ प्रभूने आधीच उघड केले आहे की, ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. अशात अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत नागा चैतन्यने खुलासा केला की, तोही आयुष्यात पुढे गेला आहे. पण जेव्हा लोक तिसर्‍या व्यक्तीला सामील करतात आणि त्याच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलतात तेव्हा त्याला वाईट वाटते.

नागा चैतन्य (naga chaitanya) सध्या त्याच्या आगामी ‘कस्टडी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेता त्याच्या व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसत आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, नागा चैतन्यने उघड केले की, जेव्हा त्याने सामंथाशी लग्न केले, तेव्हा त्याच्या आयुष्यातील त्या टप्प्याबद्दल त्याला खूप आदर आहे. तो म्हणाला की, ‘त्याच्याकडे सामंथाबद्दल सांगण्यासारख्या सर्व छान गोष्टी आहेत, परंतु जेव्हा तिच्याबद्दल चुकीचे बाेले जाते, तेव्हा गोष्टी अवघड होतात.’

सामंथाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, ‘ती एक सुंदर व्यक्ती आहे आणि सर्व आनंदाची पात्र आहे. जेव्हा मीडिया तिच्याबद्दल अंदाज लावतो, तेव्हा त्याविषयी चर्चा हाेते. लाेकांच्या नजरेत तो परस्पर आदर हिरावून घेतला जातो आणि त्यामुळेच मला वाईट वाटते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

नागा चैतन्य आपला मुद्दा पुढे करत म्हणाला की, ‘जेव्हा तिसर्‍या व्यक्तीला त्याच्या पास्टसाठी दोष ठरवल्या जाते, तेव्हा त्याला वाईट वाटते.’ अभिनेता म्हणाला, ‘ते लाेक त्यांच्यामध्ये काेणत्याही तिसऱ्या व्यक्तीला मधात आणतात, ज्यााचा माझ्या भूतकाळाशी काहीही संबंध नाही. का, तर? चर्चेत राहण्याासठी. हे तिसऱ्या व्यक्तीसाटी खूपच अपमानास्पद गाेष्ट आहे, ज्याला ते विणाकारण माध्या भूतकाळाशी जाेडत आहे.(tollywood actor naga chaitanya custody actor calls samantha ruth prabhu lovely person said both of us have moved on in life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…

प्रतीक्षा संपली! धमाल कॉमेडी चित्रपट सासूबाई जोरात ‘या’ तारखेला हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा