Wednesday, August 13, 2025
Home साऊथ सिनेमा दोन इंडस्ट्रीत सुरू असलेल्या भाषेच्या वादावर आलं नागार्जून यांचं वक्तव्य, बोलले ‘ही’ मोठी गोष्ट

दोन इंडस्ट्रीत सुरू असलेल्या भाषेच्या वादावर आलं नागार्जून यांचं वक्तव्य, बोलले ‘ही’ मोठी गोष्ट

साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुन यांची (Nagarjuna) प्रतिक्रिया आली आहे. कलाकारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी प्रादेशिक भावना बाजूला ठेवायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तेलुगू भाषेत प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’च्या वीकेंडच्या एपिसोडदरम्यान नागार्जुन संभाषण करत होते. रियॅलिटी शो होस्ट करत असलेल्या या अभिनेत्याने यावेळी ‘बिग बॉस’ स्पर्धक नटराजला फटकारले.

नागार्जून म्हणाले की, नटराजने त्याची सहकारी स्पर्धक बिंदूला शोमध्ये टिकवून ठेवण्यासाठी वोट करावे, कारण ती देखील चेन्नईची आहे आणि शो संपल्यानंतर चेन्नईला परत जाईल. यादरम्यान नटराज म्हणाला की, तो टॉलिवूडचा एक भाग असल्याने तेलुगू प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. (tollywood actor nagarjuna reaction to language dispute)

यावेळी चेन्नई, तेलगू, दक्षिण आणि उत्तरेबद्दल हे सर्व बोलण्याची गरज नाही, असे म्हणत नागार्जुनने नटराजाची निंदा केली. राज्यांच्या फाळणीपूर्वी ९०% चित्रपट उद्योग चेन्नईत होता. ते म्हणाले की, “कलाविश्व सर्वांसाठी खुले आहे.” नागार्जुन म्हणाले की, “कलाकारांनी त्यांच्या चित्रपट उद्योगात यशस्वी होण्यासाठी त्यांच्या प्रादेशिक भावना बाजूला ठेवाव्यात.”

‘बिग बॉस तेलुगू’ ही हिंदी भाषेतील रियॅलिटी शो ‘बिग बॉस’चे ओटीटी व्हर्जन आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार्‍या या शोचा २२ मे रोजी ग्रँड फिनाले आहे. सध्या बिंदू, अखिल सार्थक, शिवा, एरियाना ग्लोरी, बाबा भास्कर, अनिल राठोड आणि मिथ्रव ट्रॉफी उचलण्याच्या शर्यतीत आहेत. नटराज रविवारीच शोमधून बाहेर पडला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘पती- पत्नीमध्ये जे काही होते ते…’, म्हणत नागा अन् समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांची मोठी प्रतिक्रिया

इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री सुपरस्टार नागार्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर, ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

नागार्जुन- तब्बूपासून ते अनुष्का- प्रभासपर्यंत, टॉलिवूडचे ‘हे’ ५ अफेअर्स होते भलतेच चर्चेत, पाहा यादी

हे देखील वाचा