Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड लग्नाचे 10 वर्ष हाेईपर्यंत राम चरणची पत्नी उपासना हिने का हाेऊ दिले नाही मुल? अखेर केला खुलासा

लग्नाचे 10 वर्ष हाेईपर्यंत राम चरणची पत्नी उपासना हिने का हाेऊ दिले नाही मुल? अखेर केला खुलासा

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी लवकरच आई-वडील होणार आहेत. अलीकडेच उपासनाने दुबईमध्ये तिचा बेबी शॉवर साजरा केला, ज्याची एक झलक तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. त्याच वेळी उपासनाने खुलासा केला की, लग्नाच्या 10 वर्षानंतर आई-वडील होण्याचा निर्णय तिचा आणि पती राम चरणचा होता.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत उपासना (upasana) हिने आई झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच तिने लग्नाच्या 10 वर्षानंतर आई-वडील होण्याचा निर्णय का घेतला हे देखील सांगितले आहे. ती म्हणाला, ‘मी खूप उत्साहित आहे आणि मला खूप अभिमान आहे की, मी समाजाच्या इच्छेनुसार नव्हे तर आम्हाला हवे तेव्हा आई बनण्याचा निर्णय घेतला. यामुळेच आम्ही लग्नाच्या 10 वर्षांनी मूल होण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की, ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण, आम्ही दोघेही चांगल्या स्थितीत आहोत.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही दोघेही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहोत आणि आमच्या मुलाची काळजी स्वतः घेऊ शकतो. हा आमचा परस्पर निर्णय होता. दाम्पत्य म्हणून आम्ही आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ दिला नाही, मग तो समाजाचा असो किंवा आमच्या कुटुंबाचा.’

राम चरण आणि उपासना यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली. एकत्र शिकत असताना राम आणि उपासना खूप चांगले मित्र बनले आणि नंतर लग्न झाले. राम चरण आणि उपासना यांची जोडी चाहत्यांना कपल गोल्स देते. आजही दोघे एकमेकांसाठी बनलेले दिसतात.

राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, ‘आरआरआर’च्या यशानंतर तो आता ‘गेम चेंजर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासाेबत अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. कार्तिक सुब्बुराज लिखित, ‘गेम चेंजर’ हा शंकरचा तेलुगु पदार्पण आहे. राम चरण आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त, चित्रपटात अंजली, एसजे सूर्या, जयराम, सुनील, श्रीकांत, नवीन चंद्र, नस्सर, समुथिराकणी आणि रघु बाबू प्रमुख भूमिकेत आहेत.(tollywood actor ram charan wife upasana breaks silence on becoming parents after 10 years of marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिगंबर नाईक याचं ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर; ‘या’ तारखेला हाेणार शुभारंभाचा प्रयाेग

‘विचार करून प्रेम हाेत…’ म्हणत पलक तिवारीने इब्राहिमसाेबतच्या नात्यावर केला खुलासा

हे देखील वाचा