Tuesday, March 5, 2024

दहा वर्षानंतर पहिल्यांदाच प्रेग्नंट असलेल्या राम चरणच्या पत्नीने शाे केला बेबी बंप, एकदा व्हिडिओ पाहाच

आरआरआर‘ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. अलीकडे, अभिनेत्याने 27 मार्च रोजी त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह साजरा केला, ज्याचे फाेटाे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अशात आता पुन्हा एकदा राम चरण आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी तिचा बेबी बंपला फ्लॉंट करताना दिसत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (ram charan) पुन्हा एकदा आपल्या पत्नी उपासना कामिनीसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर मीडियामध्ये दिसला आहे. काल रात्री म्हणजेच (दि. 27 मार्च)ला राम चरण आणि उपासना एका कार्यक्रमादरम्यान स्पाॅट झाले. या फंक्शनमध्ये राम ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. तर, त्याची पत्नी उपासना रॉयल ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली.

विशेष म्हणजे, राम चरणची पत्नी उपासना ही पाच महिन्यांची प्रेग्नट असून या वर्षाच्या शेवटी ती आपल्या मुलाला जन्म देणार आहे. फाेटाेमध्ये, उपासनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लाे स्पष्टपणे दिसत आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, राम चरण आणि उपासना दहा वर्षांनी आई-वडील होणार आहेत. या जाेडप्यांचा विवाह 14 जून 2012 रोजी झाला असून हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू-नाटू’ या गाण्यासाठी ऑस्करच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय अभिनेत्याने त्यांच्या पत्नीला दिले हाेते. ‘आरआरआर’ चित्रपटा व्यतिरिक्त अभिनेत्याने अनेक दमदरा चित्रपटात काम केले आहे, ज्यामध्ये ‘मगधीरा’, ‘चिरुथा’, ‘बेटिंग राजा’,’येवडू’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. (tollywood actor ram charan wife upasana kamineni five months pregnant flaunts baby bump in media )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीने संपवले जीवन, अभिनयासोबतच गायनातही होती कुशल

‘करण-अर्जुन’ सिनेमासाठी सलमान खान नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंत, राकेश रोशन यांचा खुलासा

हे देखील वाचा