साऊथ सुपरस्टार राम चरण लवकरच वडील होणार आहेत. अभिनेत्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेलाच्या प्रेग्नसीची माहिती शेअर केली होती. त्याच बरोबर एप्रिल महिन्यात उपासना हिचा बेबी शाॅवर साेहळा पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहेत, जे दुबईतील असल्याचे सांगितले जात आहे.
राण चरण (ram charan) आणि उपासना कामिनेनी (upasana kamineni) लग्नाच्या 10 वर्षानंतर पालक बनणार आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरून त्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. फोटोंमध्ये, पांढऱ्या लेसच्या मॅक्सी आउटफिटमध्ये उपासना खूपच सुंदर दिसत आहे. तसेच, ते बेबी शॉवर फंक्शनचा पुरेपूर आनंद देखील घेत आहे.

बेबी शाॅवरचे फाेटाे बघता स्पष्टपणे लक्षात येते की, तिने आपला लूक खूपच सिंपल ठेवला हाेता. कमी मेअकप आणि खुल्या केसांमध्ये उपसनाचा प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसत आहे. यासाेबत तिने काळ्या रंगाचा चष्माही लावला आहे.
राम चरणने ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळण्याचे श्रेय पत्नी उपासना हिला दिले होते. सुपरस्टारने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘माझी पत्नी माझ्यासाठी नेहमीच भाग्यवान राहिली आहे. त्याच वेळी, आत आमचे वाढणारे मूल आमच्यासाठी अधिक भाग्यवान आहे.’
अभिनेता राम चरण आणि उपासना कामिनेनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पालक बनल्याची माहिती दिली होती. भगवान हनुमानाचा फोटो शेअर करत या जोडप्याने प्रियजनांना त्यांच्या आशीर्वादाची विनंती केली होती. हे जोडपे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप उत्सुक आहे. राम चरणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत त्याच्या आगामी ‘गेम चेंजर’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.(tollywood actor ram charan wife upasana kamineni konidela baby shower done in dubai pictures going viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमात बाॅलिवूडकरांची हजेरी, रेखा आणि नीता अंबानींचा हा फोटो होतोय व्हायरल
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूडसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज