साऊथचा सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना पहिल्यांदाच आई वडिल हाेणार आहे. या जाेडप्यानी 2012मध्ये लग्न केले असून लग्नाच्या 10 वर्षांनंतर हे जोडपे पालक हाेणार आहे. अशात आता प्रेग्नंसीबाबत बोलताना उपासनाने एक माेठा खुलासा केला आहे, ज्यामुळे उपासना चांगली चर्चेत आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
खरे तर, उपासना हिने प्रेग्नंसीबाबत काही निर्णय खूप आधीच घेतले असून एग फ्रिज केले हाेते. अशात अलीकडेच एका मुलाखतीत एग फ्रिजच्या प्रक्रियेबद्दल बोलताना उपासना (upasana) म्हणाली की, ‘राम (ram charan)आणि तिने त्यांच्या नात्यात खुप लवकरच एग फ्रिज करण्याचा निर्णय घेतला होता. कारण, मूल होण्याआधी त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि मजबूत व्हायचे होते.’
View this post on Instagram
उपासना पुढे म्हणाली, ‘आमच्या लग्नाचा निर्णय देखील आम्ही फार पुर्वीच घेतला हाेता. आम्हाला निश्चितपणे विश्वास होता की, विविध कारणांमुळे आम्हाला त्यावेळी आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आज आम्ही दोघेही जिथे आहाेत तिथे आमच्याय बाळाची आमच्या कमावलेल्या पैशाने काळजी घेऊ शकतो आणि एक चांगली जीवनशैली देऊ शकतो. यासाेबतच त्यांचे चांगले पालनपाेषन देखील करू शकताे.’
View this post on Instagram
उपासना म्हणाली की, ‘लोक म्हणतील की, आपल्याला वारसा खूप मिळाला आहे. मात्र, शेवटी आपण आपल्या मुलासाठी काय ठेवतो. आपण काय कमावतो? ते लक्षात येते. आम्ही आमच्या विचारांच्या मार्गात काहीही येऊ दिले नाही आणि मला वाटते की, याच कारणांमुळे मला आमच्या नातेसंबंधाचा खरोखरच खूप आदर वाटतो.’
राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, ‘आरआरआर’च्या यशानंतर तो आता ‘गेम चेंजर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासाेबत अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. (tollywood actor ram charan wife upasana said they decided to freeze eggs early in their marriage because of their career )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरी दीक्षितच्या घरी चाहत्याचा भन्नाट किस्सा, दत्तक घ्या म्हणत सामान घेऊन आला होता घरी
“मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे” सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडे यांनी व्यक्त केली भावना