Saturday, June 29, 2024

‘मला पाठीचा खूप त्रास…’, म्हणत रश्मिकाने सांगितले डान्स न करण्याचे कारण

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘पुष्पा‘मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकरुन चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटामुळे ही अभिनेत्री खूप लोकप्रिय झाली. चित्रपटातील तिचे ‘सामी-सामी‘ गाणेही लोकांना प्रचंड आवडले. मात्र, अशात अलीकडेच, अभिनेत्रीने या आयकॉनिक गाण्यावर डान्स स्टेप करण्यास नकार दिला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

तर झाले असे की, अलीकडेच ‘पुष्पा’ (pushpa) स्टार रश्मिका मंदाना (rashmika mandanna) हिने ट्विटरवर ‘आस्क मी एनीथिंग सेशन’ होस्ट केला हाेता. या दरम्यान, एका चाहत्याने रश्मिकाला विनंती केली की, “मला तुझ्यासोबत सामी-सामी गाण्यावर डान्स करायला आवडेल, तु माझ्यासाेबत डान्स करणार का?”, ज्यावर रश्मिका उत्तर देते म्हणाली, “मी अनेक वेळा सामी-सामी गाण्यावर डान्स स्टेप केली आहे. त्यामुळे मला आता वाटतं की, म्हातारी झाल्यावर मला पाठीचा खूप त्रास होईल. तुम्ही लाेक माझ्याशी असे का करता?, जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण आणखी काही करू.” असे म्हणत रश्मिकाने तिच्या चाहत्याला चक्क नकार दिला.

‘पुष्पा’चित्रपट डिसेंबर 2021मध्ये रिलीज झाल्यानंतर रश्मिका ‘सामी सामी’गर्ल म्हणून प्रसिद्धीच्या झाेत्यात आली. अशात अलीकडेच ती एका अवॉर्ड शोमध्ये या गाण्यावर परफॉर्म करताना दिसली.

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री रणबीर कपूरसोबत ‘एनिमल’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात  रणबीरसोबत पहिले परिणिती चोप्राची जोडी पाहिल्या गेली होती, नंतर तिची जागा रश्मिकाने घेतली.(tollywood actress rashmika mandanna refuses to dance on pushpa popular song sami sami )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…’ अमृता खानविलकरचा ‘ताे’ व्हिडिओ चर्चेत

‘मर्यादा’ याच गोष्टीमुळे शाहरुख आर्यन खान केसमध्ये होता शांत, त्याच्या मित्राने केला खुलासा

हे देखील वाचा