Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड समंथा रुथ प्रभूने अनवाणी पायाने 600 पायऱ्या चढून मंदिराला दिली भेट, कारण घ्या जाणून

समंथा रुथ प्रभूने अनवाणी पायाने 600 पायऱ्या चढून मंदिराला दिली भेट, कारण घ्या जाणून

साऊथ लाेकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या बहुप्रतिक्षित आगामी तेलगू चित्रपट ‘शकुंतलम‘च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री चित्रपटाच्या यशासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशात आता समांथाचे काही फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती 600 पायऱ्या चढून मंदिरात पोहोचताना आणि वाटेत कापूर जाळताना दिसत आहे.

समंथाने अलीकडेच प्रेम कुमारचा तेलुगु चित्रपट जानूचे शूटिंग सुरू केले आहे. यासोबतच अभिनेत्रीने वेळ काढून पझनी मुरुगन मंदिराला भेट दिली. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 600 पायऱ्या पार कराव्या लागतात. सामंथानेही असेच काहीसे केले असून मंदिरातील धार्मिक विधीही पूर्ण केल्या. साध्या सलवार सूटमध्ये मंदिरात पोहोचलेल्या अभिनेत्री समंथाने वाटेत कापूर जाळून मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास पूर्ण केला. यासोबतच तिने चाहत्यांसोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले.

पौराणिक कथेपासून प्रेरित आहे ‘शाकुंतलम’
‘शाकुंतलम’ चित्रपटात समंथाने मेनका आणि विश्वामित्र यांच्या मुलीची शाकुंतलाची भूमिका साकारली आहे. गुणशेखर निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा प्राेजेक्ट समंथाचा गुणशेखरसोबतची पहिली भागीदारी आहे. चित्रपटाची कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पौराणिक कथेपासून प्रेरित असून महान कवी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकातून ती साकारली आहे.

नुकताच समंथाच्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. वरुण धवनने हा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटात समंथा आणि देव मोहन व्यतिरिक्त अल्लू अर्हा, सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला, जिशू सेनगुप्ता हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

(tollywood actress samantha ruth prabhu before the release of shakuntalam samantha climbed 600 steps barefoot to visit pazhali temple)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शहजादा’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

प्राजक्ता माळी झाली ‘या’ नवीन संघटनेची सदस्य, सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा