Wednesday, March 29, 2023

पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शहजादा’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

मंडळी 17 फेब्रुवारीला दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये एक मार्वल मुव्हीजचा ‘अँट मॅन 3‘ आणि दुसरा कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा‘ या चित्रपटाचा समावेश आहे. दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. चाहत्यांमध्ये या दोन्ही चित्रपटांची क्रेझही सारखीच आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये माेठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील ‘कॅरेक्टर ढिला 2.0’ या गाण्याने आधीच लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे, पण हा चित्रपट थिएटरमध्ये किती धमाल करतो, हे 17 फेब्रुवारीलाच कळेल. अशात आता चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे स्टेटस समोर आले आहे.

शहजादा (shehzada) हा तमिळ चित्रपट ‘आला वैकुंदपुल्ला’ चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होते. या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनसोबत क्रिती सेननची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. मात्र, ज्या गाण्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ‘कॅरेक्टर ढिला 2.0’. या गाण्याला यूट्यूबवर जगभरात 50 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अशात गाण्यानंतर अॅडव्हान्स बुकिंगचे स्टेटस समोर आले आहेत.

advance booking of shehzada

चित्रपट क्रिटिक तरण आदर्श यांनी ‘शेहजादा’ तसेच ‘अँट मॅन’ची अॅडव्हान्स बुकिंग स्टेटस शेअर केले आहेत. शहजादाची पीवीआरमध्ये 1845, आईनॉक्समध्ये 1000 आणि सिनेपॉलिसमध्ये 638 तिकिटे विकली गेली आहेत. म्हणजे या चित्रपटाची एकूण 3,483 तिकिटे विकली गेली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

त्याच वेळी, मार्व्हल मूव्हीजच्या ‘अँट-मॅन 3’ची अॅडव्हान्स बुकिंग खूप पुढे आहे. या चित्रपटाची एकूण 43,907 तिकिटे विकली गेली आहेत. पीवीआरमध्ये 24,860 तिकिटे, आईनॉक्समध्ये 12,000 आणि सिनेपॉलिसमध्ये 7,047 तिकिटे विकली गेली आहेत. पेटन रीड दिग्दर्शित हा चित्रपट हॉलिवूडप्रेमींसाठी चांगली स्टाेरी घेऊन येऊ शकतो.(advance booking of shehzada film gets tough competition from ant man )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुकेशचे उफाळून आले जॅकलिनवरील प्रेम, कोर्टरूममधून पाठवला प्रेमळ संदेश

व्हॅलेंटाईन डे स्पेशल…पाहा बॉलिवूड कलाकारांनी आपल्या जोडीदारापुढे कशाप्रकारे व्यक्त केलं आपलं प्रेम

हे देखील वाचा