Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! समंथा रुथ प्रभूचा शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेत्री गंभीररित्या जखमी

धक्कादायक! समंथा रुथ प्रभूचा शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेत्री गंभीररित्या जखमी

साउथ फिल्म इंडस्ट्रीची लाेकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रत्येक पात्र साकारण्यात आपला जीव ओतत असते. सध्या समंथा ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिटाडेल ही एक अॅक्शन थ्रिलर सीरिज आहे, ज्याच्या इंडियन वर्जनमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन दिसणार आहेत. अशात आता ‘सिटाडेल’च्या शूटिंगदरम्यान समंथासोबत अशी घटना घडली, ज्यामुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. खरे तर, या सीरिजच्या शूटिंगदरम्यान, अॅक्शन सीन करताना सामंथा रुथ प्रभू गंभीर जखमी झाली, ज्याची माहिती तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केली करत चाहत्यांना दिली.

सामंथा रुथ प्रभू हिने ( samantha ruth prabhu ) इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या जखमी हाताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सामंथाच्या हातावर जखमा आणि कट असल्याचे दिसून येते. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पर्क ऑफ एक्शन.” समंथाच्या या फोटोवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत असून तिला काळजी घेण्यास सांगत आहेत.

samantha ruth prabhu
Photo Courtesy Instagramsamantharuthprabhuoffl

सिटाडेल ही अॅमेझाॅन प्राइम वीडियोजची ऑरिजनल वेब सीरीज आहे. या सीरीजमध्ये अभिनेत्री रिचर्ड मॅडन, प्रियांका चोप्रा आणि स्टॅनली टुसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरीजची ऑरिजनल वर्जन रुसो ब्रदर्स बनवत आहेत, तर चित्रपटाचे हिंदी रूपांतर राज आणि डीके बनवत आहेत. या स्पाय थ्रिलर सीरिजच्या हिंदी व्हर्जनमध्ये अभिनेता वरुण धवन सामंथासोबत जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच तेलुगू चित्रपट ‘शकुंतलम’ मध्ये दिसणार आहे. गुणशेखर दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शकुंतलाची मुख्य भूमिका समंथा साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून, समंथाचा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. (tollywood actress samantha ruth prabhu injured while shooting action sequence of citadel shared with fans)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाडं फुटलं रे! अखेर क्रितीने तिच्या सीक्रेट बाॅयफ्रेंडचा केला खुलासा, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

राजीवने चारुच्या वाढदिवशी केली अशी काही पाेस्ट की, युजर्स संतापूण म्हणाले, ‘कधी तुमचा घटस्फोट…’

हे देखील वाचा