Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड नवीन वर्षाच्या अगाेदर समंथाने शेअर केली नाेट; म्हणाली, ‘जे काही नियंत्रित करू शकतो…’

नवीन वर्षाच्या अगाेदर समंथाने शेअर केली नाेट; म्हणाली, ‘जे काही नियंत्रित करू शकतो…’

दक्षिणेतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक समंथा हिच्यासाठी 2022 हे वर्ष बऱ्यापैकी गेले. या वर्षी समंथाला मायोसिटिस नावाच्या गंभीर आजाराचे निदान झाले होते, तर तिच्या ‘काथुवाकुला रेंदु काधल’ आणि ‘यशोदा’ या दोन चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दोघांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. आता वर्ष संपण्यापूर्वी समंथाने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि याासाेबतच एक नाेटही लिहिली. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, समंथाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. कारण, अभिनेत्रीने तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कामातून दीर्घकाळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर आता अभिनेत्रीने तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यासोबत एक नोटही लिहिली आहे. सामंथाने लिहिले, “फंक्शन फॉरवर्ड… आपण जे काही नियंत्रित करू शकतो ते आपण नियंत्रित केले पाहिजे. नवीन आणि सोप्या संकल्पांची वेळ आली आहे असे दिसते. जे आमच्यासाठी दयाळू आणि विनम्र आहेत. त्यांच्यावर देवाचा आशिर्वाद. 2023 च्या शुभेच्छा!!”

काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांनी खुलासा केला होता की, समंथाने तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांमधून दीर्घकाळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ती पूर्णपणे निरोगी झाल्यानंतरच परत येईल. विजय देवरकोंडा आणि कुशीसोबतचा तिचा चित्रपट 60 टक्के पूर्ण झाला आहे. त्यामुळे समंथाला दीर्घ ब्रेक घेण्यापूर्वी चित्रपटाचे काम पूर्ण करायचे आहे.

इतकंच नाही, तर तिच्यामुळे चित्रपटांच्या रिलीजला उशीर होऊ नये असं समंथाला वाटल्यामुळे तिनं बॉलिवूड प्रोजेक्ट्समधून पाऊल बाहेर घेतलं आहे. (tollywood actress samantha ruth prabhu shares photo and writes strong note ahead of 2023 and before saying good bye to)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘केजीएफ 3’ मध्ये कॅमिओ करतोय का हार्दिक? सोशल मीडियावर पोस्ट होतेय तुफान व्हायरल

तुनिषा शर्माच्या आईने केले गंभीर आरोप, ‘शीजानचे कुटुंबिय तुनिषावर धर्मांतराचा दबाव…’

हे देखील वाचा