Thursday, November 30, 2023

‘केजीएफ 3’ मध्ये कॅमिओ करतोय का हार्दिक? सोशल मीडियावर पोस्ट होतेय तुफान व्हायरल

साउथमधील केजीएफ स्टारर यश आपल्या दमदार अभिनयामुळे आणि त्याचा 2022 मधील केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटामुळे अभिनेत्याला भारत देशातच नाही, तर जगभरात अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. यशचा रुबाबदारपणा आणि डायलॉग स्टाइलने अनेकांना भुरळ घातली आहे. आता चाहते उत्सुकतेने केजीएफ चॅप्टर 3 ची वाट पाहात आहेत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध क्रिकेटर हार्दिक पांड्या याने अभिनेता यशसोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये केजीएफ 3 साठी चर्चेचा विषय ठरत आहे.

भारतीय संघाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने नुकतंच आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवरुन अभिनेता यश (Yash) सोबत काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यासोबतच फोटोमध्ये हार्दिकचा भाऊ क्रुणाल पांड्यादेखिल पाहायाला मिळत आहे. चाहत्यांनी फोटो पाहाताच कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय हार्दिकने फोटो शेअर करत लक्षवेधी कमेंट केल्यामुळे केजीएफ 3 (KGF Chapter 3) चित्रपटाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

हार्दिकने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘केजीएफ 3’ हार्दिकच्या या कॅप्शमुळे अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. चाहत्यांमध्ये केजीएफ 3 चित्रपटासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “मला वाटत आहे की, हार्दिक पांड्या केजीएफ 3 मध्ये कॅमिओ करणार आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “केजीएफ 3 मध्ये क्रुणाल पांड्या व्हिलन असणार.” अशाप्रकारे चाहत्यांमध्ये केजीएफ 3 चित्रपटासाठी चर्चा सरु झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिने देखिल ‘केजीएफ 2’ मध्ये काम केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या भुमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते. नुकतंच अभिनेत्रीने एका इवेंटमध्ये हजेरी लावली होती तेव्हा पॅपराजींनी सांगितले होते की, आम्ही केजीएफ 3 ची वाट पाहात आहोत. याच्या उत्तरामध्ये अभिनेत्रीने सांगितले की, खूपच लवकर येणार आहे.

सांगायचे झाले तर ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ या चित्रपटांनी यश पॅन स्टार बनला आहे.  केजीएफ चित्रपट साउथ इंडस्ट्रीच्या इतिहासामधील सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात 1200 कोटींची कमाइ केली आहे. येत्या 8 जानेवारीला अभिनेता यशचा वाढदिवस आहे त्यामुळे असेही म्हटले जात आहे की, यशच्या वाढदिवशी केजीएफ 3 चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘राजकारण्यांसाठी कालकार बळीचा बकरा…’, बॉलिवूमध्ये बॅन केल्यामुळे माहिरा खानने व्यक्त केला संताप
कंगना रनौतने पोस्ट शेअर करत हिराबेन मोदीजींच्या निधनावर व्यक्त केले दु:ख

 

हे देखील वाचा