राम चरण आणि उपासना कामिनेनी एका लहान मुलीचे आई-वडील झाल्यामुळे खूप आनंदी आहेत. 20 जून 2023 रोजी, उपासनाने हैदराबादच्या जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात मुलीला जन्म दिला, ज्याचे अनेक फाेटाे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. त्याच वेळी, उपासनाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये डॉक्टर तिला डिलिव्हरी रूममध्ये नेताना दिसत आहेत.
23 जून रोजी राम आणि उपासना आपल्या लाडक्या लेकीला घेऊन घरी पोहोचले, जिथे त्यांच्या लाडक्या लेकीचे स्वागत धुमधड्याक्यात करण्यात आले. दरम्यान, मुलीच्या जन्माच्या काही तासांपूर्वी उपासनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान ती खूपच आनंदी दिसत आहे. उपासना हिने तिची मैत्रिण मेहा पटेलची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सांगितले की, “5 दिवसांपूर्वी आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण.”
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये उपासनासाेबत डॉक्टर, नर्स आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य जाताना दिसत आहेत, जे तिच्यासोबत लेबर रूममध्ये जात आहेत. आपल्या मैत्रिणीचा आनंद पाहून मेहा असे म्हणताना ऐकू येते की, “उपसी, तुझ्या डाेळ्यात क्वचितच पाणी येते, तर उपासना म्हणते, “तुम्ही लोक माझा आनंद आहात.”
View this post on Instagram
आई झाल्यानंतर चार दिवसांनी उपासनाने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता राम चरणसाेबत कुत्रा दिसत आहे, तर तिथेच उपासनासाेबत तिची मुलगी आहे. फाेटाेच्या बॅकग्राउंडला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे आणि फुले दिसत आहे, यासाेबतच वेलकम होम बेबी असेही लिहिले आहे. (tollywood upasana kamineni became emotional before delivery friend shared video)
अधिक वाचा:
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत
व्हायरल फोटोंनंतर गेहना वशिष्ठने फैजानसोबत लग्न न झाल्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडचे नाव..’