एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. मात्र त्या व्यक्तीच्या चांगुलपणाच्या मागे राक्षसी चेहरा देखील असू शकतो, असे सांगणारी मालिका म्हणजेच ‘देवमाणूस’. झी मराठी या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेची लोकप्रियता या दिवसांत गगनाला भिडली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. मालिकेसोबत यातील कलाकारही घराघरात पोहचले आहेत.
मालिकेतील सरू आजी, डिंपल, टोन्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव ही पात्रं सध्या रसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रमाणेच या कलाकारांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील कमालीची आहे. यामुळेच मालिकेच्या सेटवरून बऱ्याचदा मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
या व्हिडिओमध्ये टोन्या आणि डिंपलची मजेदार केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमधून टोन्याचा निराळाच अंदाज समोर आला आहे. यामध्ये तो एका ट्रेंडिंग डायलॉगवर मजेदार अभिनय करताना दिसत आहे. तुम्ही देखील पाहू शकता की, यात तो म्हणतोय, ‘बचपन का प्यार मेरा भूल ना जाना रे…’ असे म्हणताच डिंपल त्याला सांत्वना देत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “टोन्याचं प्रेमप्रकरण….कारण ट्रेंड आहे.” या मजेदार व्हिडिओवर नेटकरी देखील मजेदार प्रतिक्रिया देत आहे. कमेंट सेक्शनमध्ये हसणाऱ्या ईमोजीचा पाऊस पडला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “याची शाळा सुरू करा रे…” तर दुसरा युजर म्हणतोय, “टोन्या तू अगोदर शाळा शिक.” तसेच या व्हिडिओवर आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी
-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा