Thursday, July 18, 2024

नाद करा पण आमचा कुठं! एका सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणारे दाक्षिणात्य अभिनेते, ‘थलायवा’चाही समावेश

दाक्षिणात्य सिनेसृष्टी म्हटलं की, आपल्याला आठवतात ते या सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अनेक दिग्गज अभिनेते. आपल्या दमदार अभिनयाने आणि लूक्समुळे हे कलाकार नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. फक्त दक्षिणेतच नाही, तर संपूर्ण चित्रपट जगतात या कलाकारांचे वर्चस्व पाहायला मिळते. आपल्या अभिनयाच्या जादुने ते प्रत्येक चित्रपटाला यशस्वी ठरवतात म्हणूनच त्यांच्या नावाची बॉलिवूडमध्येही कायम चर्चा होत असते. या कलाकारांच्या चित्रपटांसोबतच नेहमी चर्चा होते, ती त्यांच्या मानधनाची. हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन हे अभिनेते घेत असतात. त्यांच्या एका चित्रपटाची फी ही कोटींच्या घरात आहे. चला तर जाणून घेऊया दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १० प्रमुख कलाकारांबद्दल.

रजनीकांत
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे ‘थलायवा’ म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले रजनीकांत हे त्यांच्या मानधनासाठी सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत. म्हणूनच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. रजनीकांत यांनी आपल्या एका चित्रपटासाठी तब्बल ३० कोटी इतके मानधन घेतले होते, तेव्हापासून ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले आहेत. रजनीकांत हे आपल्या प्रत्येक सिनेमासाठी ६० कोटी रुपये मानधन घेतात.

विजय
अभिनेता विजय (Vijay) हा सध्या चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक येणाऱ्या धमाकेदार चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहे. त्याचे ‘नंबन’, ‘थुपक्की’, ‘जिल्ला’, ‘कथ्थी’ आणि ‘मास्टर’ हे चित्रपट जोरदार हिट ठरले आहेत. त्याच्या एका चित्रपटाची फी सुमारे ४५ ते ६० कोटी रुपये इतकी आहे.

अजित कुमार
आपल्या स्टायलिश लूकमुळे आणि दमदार अभिनयाने अजित कुमार (Ajith Kumar) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अजितला ‘बिल्ला’ चित्रपटाने भरभरून लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्या एका चित्रपटाची फी ४० ते ५० कोटी रुपये इतकी आहे.

कमल हासन
दाक्षिणात्य चित्रपटांतील आणखी एक दिग्गज आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे कमल हासन (Kamal Haasan) होय. कमल हे दीर्घकाळ चित्रपटसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या एका चित्रपटाचे मानधन हे तब्बल २५- ३० कोटी इतके आहे. त्यांना ‘दशवतारम’ चित्रपटसाठी १० कोटी रुपयेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, ‘विश्वरुपम’ च्या यशानंतर त्यांनी आपले मानधन २५ कोटी रुपये केले.

सूर्या
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा ‘सिंघम’ म्हणून अभिनेता सूर्याचे (Suriya) नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि ऍक्शनमुळे त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत आहे. त्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाने तर कमाइचे सर्व विक्रम मोडित काढले होते. सूर्या एका चित्रपटासाठी २० ते २२ कोटी रुपये इतके मानधन घेतो.

विक्रम
अभिनेता विक्रम (Viram) हा तरुण आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष केलेला हा प्रतिभावान अभिनेता सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक दर्जेदार चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. विक्रमच्या एका चित्रपटाचे मानधन २० कोटी रुपये इतके आहे.

हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला

धनुष
‘कोलावरी डी’ गाण्याने रातोरात स्टार झालेला आणि सध्या आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टी गाजवत असलेला लोकप्रिय अभिनेता धनुष (Dhanush) याचाही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत समावेश होतो. तो ‘रांझना’ आणि ‘शमिताभ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्येही झळकला आहे. धनुषच्या एका चित्रपटाचे मानधन जवळपास १५ कोटी इतके आहे.

कार्थी
कार्थी (Karthi) हा तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेता कार्थी एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपये घेतो.

हेही वाचा-

हे देखील वाचा