Tuesday, July 23, 2024

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम करणारी मिनिषा लांबा आता आहे तरी कुठे? वाचा सविस्तर

अभिनेत्री मिनिषा लांबाने (Minnisha Lamba) जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा ती तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे खूप चर्चेत होती. तिचे खूप कौतुकही झाले, पण हळूहळू ती चित्रपट जगापासून दूर गेली. मात्र, मिनिषा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आजही तिची चांगली फॅन फॉलोविंग आहे. ती तिचे फोटो खासकरून इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मिनिषा मंगळवारी (१८ जानेवारी) तिचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे.

‘यहाँ’मधून केले पदार्पण
मिनिषाचा जन्म १८ जानेवारी १९८५ मध्ये झाला. तिने २००५ मध्ये ‘यहाँ’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही. यानंतर तिने ‘कॉर्पोरेट’ आणि ‘रॉकी’ सारखे चित्रपट केले. पण ‘बचना ए हसीनों’ मधून तिला ओळख मिळाली. या चित्रपटात मिनिषा लांबा व्यतिरिक्त रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण सारखे स्टार्स देखील होते. हा चित्रपट यशराज बॅनरखाली बनवला होता. यानंतर ती ‘किडनॅप’ आणि ‘भेजा फ्राय’सह आणखी काही चित्रपटांमध्ये दिसली.

‘बिग बॉस’मध्येही दिसलीय अभिनेत्री
मिनिषा शेवटची २०१७ मध्ये ‘भूमी’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि आदिती राव हैदरी देखील होते. चित्रपटांव्यतिरिक्त ती ‘बिग बॉस ८’ मध्ये देखील सहभागी झाली आहे. बिग बॉसच्या मध्यात तिला घरातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर तिने ‘तेनाली रामा’ आणि ‘इंटरनेट वाला लव’ सारखे टीव्ही शो देखील केले. मिनिषा वादाचीही शिकार झाली होती.

आर्य बब्बरमुळे सापडली होती वादात
‘बिग बॉस ८’ नंतर आर्य बब्बरने मिनिषाबद्दल सांगितले होते की, तो ‘बिग बॉस ८’ ची सह-स्पर्धक आणि अभिनेत्री मिनिषासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, मनिषाने याला स्पष्ट नकार दिला होता. आर्य बब्बरलाही मिनिषाची माफी मागावी लागली. अभिनेत्री आणि मॉडेल मिनिषालाही एकदा गोव्याच्या समुद्रकिनारी छेडछाडीची शिकार झाली होती. ती प्रत्यक्षात गोव्यात एका फोटोशूटसाठी शूटिंग करत होती. तेव्हा अनेकांनी तिला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

२०१८ मध्ये झाले होते लग्न

मिनिषाने चित्रपट सोडल्यानंतर रायन थमशी लग्न केले. २०१३ मध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये मिनिषाचा पतीसोबत घटस्फोट झाला. घटस्फोटावर ती म्हणाली होती की, “एखाद्याचे लग्न किंवा नातेसंबंध संपणे म्हणजे त्याचे आयुष्य संपत नाही. तुम्हाला प्रेम करण्याची आणि प्रेम शोधण्याची एक नवीन संधी देखील मिळते, जेणेकरून तुम्ही तुमचा भूतकाळ विसरू शकता आणि पुढे जाऊ शकता.”

घटस्फोटानंतर केला नात्याचा खुलासा
मिनिषा लांबाने २०२१ मध्ये खुलासा केला होता की, ती बिझनेसमॅन आकाश मलिकला डेट करत आहे. तिने इंस्टाग्रामवर आकाशसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. मिनिषा लांबा दिल्लीत राहते आणि आता तिला ओटीटीद्वारे अभिनयाच्या जगात परतायचे आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा