बॉलिवूड सेलिब्रिटी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले राहतात. परंतु बॉलिवूड कलाकारांमध्ये इंस्टाग्राम सर्वात लोकप्रिय आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाशी संबंधित माहिती, व्यवसाय आणि जिमचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करतात. आज आपण बॉलिवूडच्या अशा १० सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तुम्हाला हे जाणून थोडे आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान या यादीत शेवटच्या स्थानावर म्हणजेच १० व्या क्रमांकावर आहे. तर अमिताभ बच्चन यांचा टॉप-१० यादीत समावेश नाही.
प्रियांका चोप्रा आहे पहिल्या क्रमांकावर
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इंस्टाग्रामवर ७२.२ मिलियन म्हणजेच ७ कोटी २२ लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत ती पहिल्या क्रमांकावर आहे. प्रियांका चोप्राचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्याचा प्रभाव तिच्या सोशल मीडिया हँडलवरही दिसून येत आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रद्धा कपूर
या यादीत प्रियंका चोप्रानंतर श्रद्धा कपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रद्धा कपूरचे इंस्टाग्रामवर ६८.५ मिलियन म्हणजेच ६ कोटी ८५ लाख फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित माहितीशिवाय ती तिचे कुटुंब, जिम आणि स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
नेहा कक्कर आहे तिसऱ्या क्रमांकावर
या यादीत गायिका नेहा कक्कर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेहा कक्करचे इंस्टाग्रामवर ६६.८ मिलियन म्हणजेच ६ कोटी ६८ लाख फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर तिच्या गाण्यांशी संबंधित माहिती, तिचे सुंदर फोटो आणि पती रोहनप्रीत सिंगसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
चौथ्या क्रमांकावर आहे दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणचे इंस्टाग्रामवर ६३.४ मिलियन म्हणजेच ६ कोटी ३४ लाख फॉलोअर्स आहेत. दीपिका अनेकदा तिच्या बालपणीचे आणि शालेय दिवसांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय ती तिचे आवडते पदार्थ, तिच्या चित्रपटाशी संबंधित माहिती शेअर करते.
पाचव्या क्रमांकावर आहे कॅटरिना कैफ
अभिनेत्री कॅटरिना कैफचे इंस्टाग्रामवर ६०.४ मिलियन ६ कोटी ४ लाख फॉलोअर्स आहेत. या यादीत ती पाचव्या क्रमांकावर आहे. ती तिच्या फोटोशूट, व्होकेशनशी संबंधित फोटो शेअर करते. अलिकडेच तिने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
अक्षय कुमार आहे सहाव्या स्थानावर
बॉलिवूडच्या ‘खिलाडी कुमार’चे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. अक्षय कुमारचे इंस्टाग्रामवर ५८.१ मिलियन ५ कोटी ८१ लाख फॉलोअर्स आहेत. अक्षय अनेकदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतो आणि चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित माहितीही शेअर करत असतो.
सातव्या क्रमांकावर आहे आलिया भट्ट
या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट सातव्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर आलिया भट्टचे ५७.५ मिलियन ५ कोटी ७५ लाख फॉलोअर्स आहेत.
आठव्या क्रमांकावर जॅकलिन फर्नांडिस
या यादीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ८ व्या क्रमांकावर आहे. जॅकलिन फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ५७.४ मिलियन म्हणजेच ५ कोटी ७४ लाख फॉलोअर्स आहेत. जॅकलिन मूळची श्रीलंकन आहे, पण तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नवव्या क्रमांकावर आहे अनुष्का शर्मा
या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्मा नवव्या क्रमांकावर आहे. अनुष्का शर्माचे इंस्टाग्रामवर ५५.९ मिलियन म्हणजेच ५ कोटी ५९ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंव्यतिरिक्त, अनुष्का अनेकदा इंस्टाग्रामवर पती विराट कोहली आणि मुलगी वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते.
दहाव्या क्रमांकावर सलमान खान
सलमान खानचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. मात्र, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत यादीत तो दहाव्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर सलमान खानचे ४८.४ मिलियन म्हणजेच ४ कोटी ८४ लाख फॉलोअर्स आहेत. टॉप-१० च्या यादीत अक्षयनंतर सलमान खान दुसरा पुरुष अभिनेता आहे.
हेही वाचा :
आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र
‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा
अजय देवगणच्या लेकीचे बोल्ड फोटो होतायत इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही पाहिले का?










