अपेक्षेपेक्षाही जास्त ऍक्शन, काल्पनिक सिनेमे आणि वर्णन न करता येईल कॉमेडी असं सर्वकाही ज्यात पाहायला मिळतं ते म्हणजे साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट. आता ड्रामा आणि ऍक्शन म्हटलं की हिरो- हिरोईन आलेच आणि त्याबरोबरच आला खलनायक. एखादा चित्रपट हिट व्हायला जेवढे हिरो-हिरोईन महत्त्वाचे असतात, तेवढाच खलनायक कसाय हे देखील महत्त्वाचेच. त्यातही कधीकधी तर खलनायक बाकी कोणत्याही पात्रापेक्षाही वरचढ ठरतो. शेवटी खलनायक या शब्दातही नायक आहेचकी, पण जेव्हा एखादा अभिनेला त्यातील खल या शब्दाला जिवंत करत ती भूमिका साकारतो, तेव्हा तो खलनायक नक्कीच भाव खाऊन जातो, आणि जेव्हा साऊथकडील चित्रपटांची बात होते, तेव्हा खलनायकांचीही चर्चा तेवढीच होते. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी साऊथमध्ये खलनायक साकारत कौतुक मिळवले आहेत, या लेखातून आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया…
प्रकाश राज
साऊथ चित्रपटांतील खलनायकांचा विचार करता पहिलंच नाव आठवतं ते म्हणजे प्रकाश राज यांचं. केवळ साऊथमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही खलनायक साकारला आहे. त्यांनी अनेक पुरस्कारही यासाठी जिंकलेत. ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खलनायकांपैकी एक आहेत. त्यांचे खलनायकी भूमिका असलेले लक्षात राहणारे चित्रपट म्हणजे गंगोत्री, पोकीरी, डूकुडू, कांचीवरम.
आशिष विद्यार्थी
साऊथ इंडिस्ट्रीतील खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले मोठे नाव म्हणजे आशिष विद्यार्थी. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आशा विविध चित्रपटांत काम केले असून हिंदीतही त्यांनी काही खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी मालिकांमध्येही कामगिरी काम केलं. नंतर त्यांना चित्रपटांतही कामं मिळत गेली. पुढे त्यांनी त्यांच्या शैलीतून खलनायक रंगवत कौतुक मिळवले. त्यांना खलनायकासाठी पुरस्कारही मिळवले. पोक्किरी, अदिती, अथनोक्कडे अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
राहुल देव
राहुल देव हे देखील या यादीत असून साऊथमधील गाजलेल्या खलनायकांमध्ये त्यांचे नाव येते. त्यांनीही आत्तापर्यंत अनेक लक्षात राहणाऱ्या खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुग्धा गोडसेबरोबर असलेल्या त्यांच्या रिलेशनबद्दल ते बरेच चर्चेत आले होते. त्याचे मास, वेदालम हे चित्रपट सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहेत.
मुकेश ऋषी
मुकेश ऋषी म्हणजे काही दिवसांपूर्वी शेर शिवराज चित्रपटात अफजल खानची भूमिका निभावलेला अभिनेता. खलनायकी भूमिकेसाठीच सर्वाधिक प्रसिद्ध असलेला मुकेश ऋषी सर्वाधिक गाजला तो साऊथ इंडस्ट्रीमध्ये. त्याने बॉलिवूडमध्येही अनेकदा खलनायकाची भूमिका केली आहे. त्यांनी ७ वर्षे न्यूझीलंडमध्ये मॉडलिंग केली होती. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले आणि त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवायला सुरुवात केली. त्यांच्यातील अभिनयाने त्यांनी केवळ साऊथमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली.
अविनाश आणि सयाजी शिंदे
अविनाश हे देखील साऊथमधील गाजलेले खलनायक. त्यांनी जवळपास दोन दशके फिल्म इंडस्ट्रीत काम केले असून २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीतील आणखी एक नाव म्हणजे सयाजी शिंदे. मराठी, हिंदी आणि साऊथ अशा विविध इंडस्ट्रीत एकदम सहज वावरणारा अभिनेता म्हणजे सयाजी शिंदे. खलनायकी भूमिकेसाठी त्यांच्या वाटेला सर्वाधिक कौतुक आले. त्यांना अनेकदा खलनायक पुरस्कारासाठी नामांकनही मिळाली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकाच धक्क्याने ‘या’ सेलिब्रिटींचा खेळ झाला खल्लास! कुणाचा डोळा गेला, तर कुणाच्या सौंदर्याला लागली नजर
शाहरुखच नाही, तर ‘या’ मराठी अभिनेत्यानेही अवलंबलाय सरोगसीमार्फत पालक होण्याचा मार्ग, मोठी आहे यादी
काळाच्या ओघात हरवलं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य, ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीचाही समावेश